Ajay Devgan Portfolio Stock: पॅनोरमा स्टुडिओजचे शेअर्स १:५ च्या रेश्योमध्ये स्प्लिट झाल्यानंतर आता गुरुवारी फोकसमध्ये आहेत. कंपनीचा शेअर आज तब्बल ८ टक्क्यांनी घसरला आणि २२६.८५ रुपयांच्या इंट्राडे नीचांकी स्तरावर पोहोचला. अजय देवगणची गुंतवणूक असलेल्या पॅनोरमा स्टुडिओजचे शेअर्स ३१ जुलै रोजी एक्स-डेटमध्ये व्यवहार करून १:५ मध्ये स्प्लिट झाले. कंपनीनं जाहीर केलेली ही पहिलीच कॉर्पोरेट अॅक्शन होती.
शेअर झाला स्प्लिट
जूनमध्ये पॅनोरमा स्टुडिओनं आपले शेअर्स १:५ च्या प्रमाणात स्प्लिट करण्याची घोषणा केली होती. अशा प्रकारे, १० रुपये फेस व्हॅल्यू असलेला प्रत्येक शेअर २ रुपये फेस व्हॅल्यूच्या ५ शेअर्समध्ये विभागला गेला. बीएसईच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवडाभरात या शेअरने १५ टक्क्यांच्या वाढीसह चमकदार कामगिरी केली आहे. शिवाय, अजय देवगणच्या शेअरमध्ये गेल्या दोन आठवड्यांत २० टक्क्यांनी वाढ झाली असून वायटीडीवर २०८ टक्के दमदार परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत हा शेअर जवळपास १०० टक्क्यांनी वाढला असून गेल्या दोन वर्षांत अनुक्रमे ११०० टक्के आणि गेल्या तीन वर्षांत १३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत या शेअरमध्ये ४३०० टक्के वाढ झालीये.
अजय देवगणकडे २ लाख शेअर्स
बीएसईवर ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार, बॉलिवूडचा स्टार अजय देवगण याच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीचे २ लाख शेअर्स होते. हे भागभांडवलाच्या १.४६ टक्के आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)