Lokmat Money >शेअर बाजार > पहिल्याच दिवशी सर्व कोटा भरला, 'या' IPO ला जबरदस्त प्रतिसाद; ३०-३२ रुपये आहे किंमत

पहिल्याच दिवशी सर्व कोटा भरला, 'या' IPO ला जबरदस्त प्रतिसाद; ३०-३२ रुपये आहे किंमत

या आयपीओला (IPO) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय. पहिल्याच दिवशी हा आयपीओ दुपटीपेक्षाही अधिक सबस्क्राईब झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 09:06 AM2023-11-22T09:06:57+5:302023-11-22T09:07:16+5:30

या आयपीओला (IPO) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय. पहिल्याच दिवशी हा आयपीओ दुपटीपेक्षाही अधिक सबस्क्राईब झाला.

all quota full first day overwhelming response to government company IPO ireda Price between 30 32 rs know details investment | पहिल्याच दिवशी सर्व कोटा भरला, 'या' IPO ला जबरदस्त प्रतिसाद; ३०-३२ रुपये आहे किंमत

पहिल्याच दिवशी सर्व कोटा भरला, 'या' IPO ला जबरदस्त प्रतिसाद; ३०-३२ रुपये आहे किंमत

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या (IREDA) आयपीओला (IPO) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय. सरकारी कंपनी इरेडाचा (IREDA) आयपीओ पहिल्याच दिवशी संपूर्ण सबस्क्राईब झाला आहे. कंपनीचा आयपीओ पहिल्याच दिवशी जवळपास दुप्पट सबस्क्राइब झाला आणि आयपीओच्या सर्व कॅटेगरी भरल्या गेल्या आहेत. ग्रे मार्केटमध्येही इरेडाच्या शेअर्सना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. सरकारी कंपनी इरेडाचे शेअर्स सुमारे 30 टक्के प्रीमियमसह ग्रे मार्केटमध्ये व्यवहार करत आहेत.

सरकारी कंपनी इरेडाचा आयपीओ पहिल्या दिवशी एकूण 1.98 पट सबस्क्राइब झाला. कंपनीच्या आयपीओचा रिटेल कोटा पहिल्या दिवशी 2.02 पट सबस्क्राइब झाला आहे. त्याच वेळी, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स (NII) श्रेणीमध्ये हा आयपीओ 2.74 पट सबस्क्राईब झाला. तर क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा (QIB) कोटा पहिल्याच दिवशी 1.34 पट सबस्क्राईब झाला. तर कर्मचारी वर्गाचाही कोटा 2.13 पट सबस्क्राईब झाला.

इरेडा आयपीओ
२१ ते २३ नोव्हेंबरपर्यंत आयपीओ खुला राहणार.
प्राईज बँड - ३० ते ३२ रुपये प्रति शेअर.
लॉट साईज - ४६० शेअर्स
किमान गुंतवणूक - १४७२० रुपये
आयपीओ साईज - २१५० कोटी रुपये
फ्रेश इश्यू - १२९० कोटी रुपये
ओएफएस - ८६० कोटी रुपये

IREDA चा व्यवसाय
या सरकारी कंपनीची स्थापना १९८७ मध्ये झाली. केंद्र सरकारच्या न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी मंत्रालयाच्या अंतर्गत याचं कामकाज चालतं. इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीचा स्टेटस असलेली ही महत्त्वाची एनबीएफसी आहे. केवळ ग्रीन फायनान्सिंग वाली देशातील सर्वात मोठी एनबीएफसी आहे. त्यांना या क्षेत्रातील ३६ वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. रिन्युएबल एनर्जीचं प्रमोशन आणि डेव्हलपमेंटसाठी सरकारच्या पुढाकारातील IREDA ची महत्त्वाची भूमिका आहे. ही कंपनी न्यू आणि रिन्यूएबल एनर्जी आणि स्मार्ट मीटर सारख्या प्रोडक्टचं फायनान्सिंग, प्रमोशन आणि डेव्हलपमेंटचं काम करते.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: all quota full first day overwhelming response to government company IPO ireda Price between 30 32 rs know details investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.