Lokmat Money >शेअर बाजार > अमेरिकेची घोषणा अन् शेअर बाजारात हाहाकार; 15 रुपयांवर आला मुकेश अंबानींचा 'हा' शेअर

अमेरिकेची घोषणा अन् शेअर बाजारात हाहाकार; 15 रुपयांवर आला मुकेश अंबानींचा 'हा' शेअर

Alok Industries share price: अमेरिकेने चिनी उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क लादण्याच्या घोषणेमुळे जगभरातील बाजारात मोठी घसरण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 19:56 IST2025-03-02T19:54:31+5:302025-03-02T19:56:12+5:30

Alok Industries share price: अमेरिकेने चिनी उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क लादण्याच्या घोषणेमुळे जगभरातील बाजारात मोठी घसरण झाली.

Alok Industries share price came at ₹ 15, there is a rush to sell it amidst the stampede in the market | अमेरिकेची घोषणा अन् शेअर बाजारात हाहाकार; 15 रुपयांवर आला मुकेश अंबानींचा 'हा' शेअर

अमेरिकेची घोषणा अन् शेअर बाजारात हाहाकार; 15 रुपयांवर आला मुकेश अंबानींचा 'हा' शेअर

Alok Industries share price: गेल्या आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजारात झालेल्या गोंधळाचा परिणाम मुकेश अंबानींच्या कंपन्यांवरही दिसून आला. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी अंबानींची वस्त्रोद्योग कंपनी आलोक इंडस्ट्रीजचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर गेले. ट्रेडिंग दरम्यान शेअर 3 टक्क्यांहून अधिक घसरून 15.24 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक आहे. व्यवहाराच्या शेवटी शेअर 15.37 रुपयांवर बंद झाला. 

डिसेंबर तिमाहीचे निकाल
टेक्सटाईल कंपनी आलोक इंडस्ट्रीजने 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत ₹273 कोटींचा तोटा नोंदवला, तर मागील वर्षी याच तिमाहीत ₹229.92 कोटींचा तोटा झाला होता. त्याच तिमाहीत कंपनीचे महसूल ₹1,253.03 कोटींवरून ₹863.86 कोटींवर आले. 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांत तोटा ₹630.89 कोटींवरून ₹741.96 कोटी झाला, तर महसूल ₹4,040.28 कोटी वरून वार्षिक 31.8 टक्क्यांनी घसरून ₹2,755.82 कोटी झाला. 

शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे झाल्यास, प्रवर्तकाकडे आलोक इंडस्ट्रीजमध्ये 75 टक्के हिस्सा आहे, तर सार्वजनिक भागधारकांचा 25 टक्के हिस्सा आहे. ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जेएम फायनान्शियल ॲसेट रिकन्स्ट्रक्शनचा संयुक्त उपक्रम आहे. यामध्ये रिलायन्सची 40.1 टक्के आणि जेएम फायनान्शियल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीची 34.91 टक्के हिस्सेदारी आहे.

भारतीय बाजारपेठेत घसरण
अमेरिकेने चिनी उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क लादण्याच्या घोषणेमुळे शुक्रवारी जगभरातील बाजारात मोठी घसरण झाली. त्याच्या दबावाखाली देशांतर्गत शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,414 अंकांनी तर निफ्टी 420 अंकांनी घसरला.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

Web Title: Alok Industries share price came at ₹ 15, there is a rush to sell it amidst the stampede in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.