Join us  

लिस्टिंग होताच 'या' IPO ने दिला बंपर परतावा, काही मिनिटांत अडीच लाखांची कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 6:04 PM

शेअर बाजारात आज एका IPO ने जोरदार एंट्री घेतली.

Alpex IPO Listing: शेअर बाजारात आज एका IPO ने जोरदार एंट्री घेतली. लिस्ट होताच शेअर्सनी बंपर परतावा दिला. ज्या गुंतवणूकदारांना या IPO अंतर्गत शेअर्सचे वाटप करण्यात आले आहे, त्यांची गुंतवणूक अल्पावधीतच तिप्पट झाली. कंपनीचे शेअर्स 329 रुपयांवर लिस्ट झाले, तर IPO ची इश्यू किंमत 115 रुपये होती. म्हणजेच, या IPO ने त्याच्या किमतीच्या 186 टक्क्यांहून अधिक परतावा दिला.

आम्ही ज्या कंपनीबद्दल बोलत आहोत, तिचे नाव Alpex Solar आहे. कंपनीचा 74.52 कोटी रुपयांचा IPO 8 फेब्रुवारी 2024 रोजी आला आणि 12 फेब्रुवारी रोजी बंद झाला. त्याचे शेअर्स 13 फेब्रुवारी रोजी वाटप करण्यात आले आणि त्याची लिस्टिंग आज, म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी झाली. या IPO चा एक लॉट 1200 शेअर्सचा होता, ज्यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांना 138,000 रुपये गुंतवावे लागले.

लिस्टिंगवर 2.5 लाखांची कमाईलिस्टिंगनंतर या IPO ने 186 टक्क्यांहून अधिक परतावा दिला. म्हणजेच, शेअर्स वाटप झालेल्या गुंतवणूकदारांना लिस्टिंगवर 2.5 लाखांपेक्षा जास्त कमाई झाली. 138,000 रुपये गुंतवलेली रक्कम जोडल्यास एकूण रक्कम 3 लाख 94 हजार 680 रुपये होईल.

दरम्यान, Alpex Solar कंपनीने IPO द्वारे एकूण 6,480,000 समभाग विक्रीसाठी ऑफर केले होते. यापैकी 1,231,200 शेअर्स किंवा 19.00% स्टेक QIB साठी राखीव होते, तर 924,000 किंवा 14.26% स्टेक NII साठी राखीव होते, तर एकूण 2,155,200 शेअर्स किंवा 33.26% स्टेक रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव होते.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक