Lokmat Money >शेअर बाजार > IPO असावा तर असा! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; अपर सर्किटवर शेअर

IPO असावा तर असा! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; अपर सर्किटवर शेअर

जबरदस्त लिस्टिंगनंतर या कंपनीच्या शेअर्सना अपर सर्किट लागलं आहे. कंपनीनं गुरुवारी शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 10:11 AM2024-02-19T10:11:46+5:302024-02-19T10:12:02+5:30

जबरदस्त लिस्टिंगनंतर या कंपनीच्या शेअर्सना अपर सर्किट लागलं आहे. कंपनीनं गुरुवारी शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली.

Alpex Solar IPO nifty sme listed Investors money doubles in one day Share on the Upper Circuit investors huge profit | IPO असावा तर असा! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; अपर सर्किटवर शेअर

IPO असावा तर असा! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; अपर सर्किटवर शेअर

Stock Market News: सोलर पॅनल उत्पादक कंपनी अल्पेक्स सोलर आयपीओनं (Alpex Solar IPO) गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. जबरदस्त लिस्टिंगनंतर या कंपनीच्या शेअर्सना अपर सर्किट लागलं आहे. कंपनीनं गुरुवारी शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली. हा आयपीओ NSE SME मध्ये 329 रुपयांवर 186 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला. कंपनीची इश्यू प्राईज 109 ते 115 रुपये प्रति शेअर होती.
 

दोन दिवसांपासून अपर सर्किट 
 

लिस्टिंगच्या दिवशीही कंपनीच्या शेअर्सना 5 टक्क्यांचं अपर सर्किट लागलं होतं. त्याच वेळी, गेल्या आठवड्यात शुक्रवारीही अल्पेक्स सोलरचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर होते. त्यामुळे अवघ्या 2 दिवसांत पोझिशनल गुंतवणूकदारांना 215 टक्के नफा झाला आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना, कंपनीच्या शेअरची किंमत एनएसई एसएमईमध्ये प्रति शेअर 362.70 रुपये होती. 
 

324 पट सबस्क्राईब झालेला आयपीओ
 

अल्पेक्स सोलरचा आयपीओ एकूण 324.03 पट सबस्क्राईब झाला होता. कंपनीच्या आयपीओ मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत आयपीओ 351.89 पट सबस्क्राईब झाला होता. त्याच वेळी, नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सच्या (NII) श्रेणीमध्ये 502.31 पट तर, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा कोटा (QIB) 141.48 पट सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदार कंपनीच्या आयपीओमध्ये 1 लॉटसाठी बोली लावू शकणार होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये 1200 शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 1,38,000 रुपये गुंतवावे लागणार होते. अल्पेक्स सोलरच्या सार्वजनिक इश्यूचा एकूण आकार 74.52 कोटी रुपयांपर्यंत होता. आयपीओपूर्वी, अॅपेक्स सोलारमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा 93.53 टक्के होता, जो आता 68.76 टक्क्यांवर आला आहे.
 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Alpex Solar IPO nifty sme listed Investors money doubles in one day Share on the Upper Circuit investors huge profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.