Join us  

अमिताभ बच्चन यांच्याकडे आहेत 'या' कंपनीचे २९८५४५ शेअर्स; आता ₹४१ वरून ₹६७७ वर पोहोचली किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 2:54 PM

Amitabh Bachchan Portfolio Stock: शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत जे सेलिब्रिटी गुंतवणूकदारांचे आवडते आहेत. आज आम्ही तुम्हाला एका शेअरबद्दल सांगत आहोत ज्यात बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचाही गुंतवणूक आहे.

Amitabh Bachchan Portfolio Stock: शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत जे सेलिब्रिटी गुंतवणूकदारांचे आवडते आहेत. आज आम्ही तुम्हाला एका शेअरबद्दल सांगत आहोत ज्यात बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचाही गुंतवणूक आहे आणि हा शेअर गेल्या काही वर्षांपासून चांगली कामगिरी करत आहे. 

आम्ही बोलत आहोत वायर कंपनी डीपी वायर्स लिमिटेडच्या शेअरबद्दल. डीपी वायर्सच्या शेअरनं गेल्या तीन वर्षांत १५०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ३ एप्रिल २०२० रोजी कंपनीचा शेअर केवळ ४१ रुपयांवर होता आणि १७ नोव्हेंबर २०२३ रोजी हा शेअर ६७७.८० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, या वर्षी या शेअरमध्ये आतापर्यंत नफावसुली झाली आहे. वायटीडीमध्ये आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये २५ टक्क्यांची घसरण झाली आहे. बीएसईवर दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्याकडे डीपी वायर्सचे २,९८,५४५ शेअर्स आहेत. हे प्रमाण १.९३ टक्के हिस्स्याइतकं आहे.

सविस्तर माहिती

बीएसईवर उपलब्ध आकडेवारीनुसार सप्टेंबर २०१८ पासून या कंपनीत अमिताभ बच्चन यांचा हिस्सा आहे. दरम्यान, हा हिस्सा कमी झाला असला तरी अजूनही १ टक्क्यांहून अधिक आहे. मध्य प्रदेशातील ही कंपनी स्टील वायर आणि प्लास्टिक फिल्म्सच उत्पादन आणि पुरवठा करते, ज्याचा वापर ऑईन आणि गॅस, एनर्जी, पर्यावरण, वीज, ऑटोमोबाइल आणि पायाभूत सुविधा यासारख्या उद्योगांमध्ये केला जातो.

२०१७ मध्ये आलेला आयपीओ

डीपी वायर्सनं २१ सप्टेंबर २०१७ रोजी आपला आयपीओ लाँच केला आणि ५ ऑक्टोबर रोजी तो ७५ रुपये प्रति शेअर दराने लिस्ट झाला. मंगळवारी डीपी वायर्सचा शेअर ४४०.७० रुपयांवर व्यवहार करत होता. यातून लिस्टिंग किमतीपासून यामध्ये ४८७ टक्क्यांची तेजी दिसून येते.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारअमिताभ बच्चन