शेअर बाजारातील मायक्रोकॅप प्रधान लिमिटेडचा शेअर (Pradhin Ltd share) आज मंगळवारी ट्रेडिंग दरम्यान फोकसमध्ये आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त खरेदी होताना दिसत आहे. प्रधान लिमिटेडच्या शेअरला आज 5% चे अप्पर सर्किट लागले असून तो 60.95 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. हा शेअरचा 52 आठवड्यांचा नवा उच्चांक आहे.
कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाल्याने या शेअरमध्ये ही तेजी दिसत आहे. प्रधान लिमिटेडला दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. हे वृत्त येताच कंपनीच्या शेअरमध्य जबरदस्त खरेदी दिसून येत आहे.
काय म्हणते कंपनी? -
प्रधान लिमिटेडने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून ₹1 अब्ज (रु. 100 कोटी) पर्यंतची ऑर्ड मिळाली आहे. या ऑर्डरअंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर सुविधासाठी Fe 600 ग्रेड TMT बार आणि बीमच्या पुरवठ्याचा समावेश आहे.
महत्वाचे म्हणजे, प्रधान लिमिटेडने स्टील आणि रियल इस्टेटच्या हाय डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये आपल्या उद्योगाचा विस्तार केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या या संभाव्य ऑर्डरमुळे प्रधान लिमिटेडच्या रेव्हेन्यूमध्ये जबरदस्त वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, स्टील सेक्टरमध्ये कंपनीची बाजार स्थिती मजबूत होण्याचीही शक्यता आहे. कंपनीचे मार्केट कॅप 22.24 कोटी रुपये एवढे आहे. तरीही तिने जवळपास 100 कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली आहे. जे कंपनीच्या मार्केट कॅपच्या तुलनेत जवळपास पाच पट अधिक आहे.
प्रधान लिमिटेडच्या शेअरला सोमवारी 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते. आणि तो 58.05 रुपये प्रति शेअरवर बंद झाला होता. महत्वाचे म्हणजे गेल्या 5 दिवसांत हा शेअर 35% पर्यंत वधारला आहे.