Join us

गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ! ₹1679 वरून आपटून थेट ₹125 वर आला हा शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 8:42 PM

या शेअरचा ऑल टाइम हाय 1679 रुपये आहे. 5 ऑक्टोबर 2007 रोजी या शेअरची किंमत या पातळीवर पोहोचली होती. कंपनीचे मार्केट कॅप 4,083.61 रुपये एवढे आहे.

रेसिडेंशिअल कमर्शिअल प्रोजेक्ट्सशी संबंधित कंपनी Anant raj च्या शेअरमध्ये गेल्या व्यवहाराच्या दिवशी 3 टक्क्यांनी तेजी दिसून आली. हा शेअर 126 रुपयांवर बंद झाला. हा शेअर ट्रेंडिंग दरम्यान 127.90 रुपयांवर पोहोचला होता. महत्वाचे म्हणजे, या शेअरचा ऑल टाइम हाय 1679 रुपये आहे. 5 ऑक्टोबर 2007 रोजी या शेअरची किंमत या पातळीवर पोहोचली होती. कंपनीचे मार्केट कॅप 4,083.61 रुपये एवढे आहे.

Anant raj लिमिटेड कंपनीने म्हटले आहे की, 25 एप्रिल 2023 रोजी कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यात गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीतील परिणाम जारी केले जातील. याशिवाय संपूर्ण अर्थिक वर्षातील परिणामही जारी केले जातील. याशिवाय, फायनल डिव्हिडंडच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळू शकते. अर्थात कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हिडंड देईल.

मल्टीबॅगर परतावा देणारा शेअर - हा शेअर गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देत आहे. या शेअरने गेल्या तीन वर्षांत 1154.98 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तसेच, दोन वर्षांच्या कालावधीत 125 टक्क्यांचा परतावा दिला आहे. याशिवाय एका वर्षाच्या कालावधीत या शेअरने गुंतवणूकदारांना 91 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तसेच या शेअरने सहामाहीचा विचार करता 33 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर तीन महिन्यांत 16 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक