Lokmat Money >शेअर बाजार > या शेअरनं गुंतवणूकदारांची लावली वाट, ₹2770 वरून थेट 8 रुपयांवर आला भाव, संकट काही थांबेने!

या शेअरनं गुंतवणूकदारांची लावली वाट, ₹2770 वरून थेट 8 रुपयांवर आला भाव, संकट काही थांबेने!

या कंपनीवर 40,000 कोटी रुपयांचे कर्ज असून ते चुकवता न आल्याने रिलायन्स कॅपिटल आता दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 08:31 PM2023-03-25T20:31:22+5:302023-03-25T20:31:46+5:30

या कंपनीवर 40,000 कोटी रुपयांचे कर्ज असून ते चुकवता न आल्याने रिलायन्स कॅपिटल आता दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे.

anil ambani led reliance capital share huge crash the price came directly to 8 rupees from ₹2770 | या शेअरनं गुंतवणूकदारांची लावली वाट, ₹2770 वरून थेट 8 रुपयांवर आला भाव, संकट काही थांबेने!

या शेअरनं गुंतवणूकदारांची लावली वाट, ₹2770 वरून थेट 8 रुपयांवर आला भाव, संकट काही थांबेने!

अनिल अंबानी (Anil ambani) यांच्या कर्जात बुडालेल्या रिलायन्स कॅपिटल (Reliance capital) या कंपनीच्या विक्री प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे. खरे तर, आपण लिलावाच्या दुसऱ्या फेरीत भाग घेण्यास तयार नाही, असे टोरेंट इन्व्हेस्टमेंट्सने रिलायन्स कॅपिटलच्या ऋणदात्यांना सूचित केले आहे. 

या वृत्तानंतर रिलायन्स कॅपिटलच्या शेअरमध्ये शुक्रवारी जवळपास 5 टक्क्यांची घसरण झाली आहे आणि तो 9 रुपयांच्याही खाली म्हणजेच, 8.86 रुपयांवर येऊन बंद झाला आहे.

अशी आहे शेअरची स्थिती - 
रिलायन्स कॅपिटलच्या शेअरचा 52 आठवड्यांतील निचांक 7.85 रुपये आहे. जो 1 मार्च 2023 रोजी होता. तसेच 52 आठवड्यांतील उच्चांक 23.30 रुपये होता. हा आकडा 11 एप्रिल 2022 चा आहे. रिलायन्स कॅपिटलच्या शेअरने जानेवारी 2008 ला 2770 रुपयांना स्पर्ष केला होता. यानंतर शेअर कोसळायला सुरुवात झाली आणी हाच ट्रेंड अद्यापही सुरूच आहे.

दरम्यान, कंपनीवर 40,000 कोटी रुपयांचे कर्ज असून ते चुकवता न आल्याने रिलायन्स कॅपिटल आता दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. या कंपनीच्या लिलावाची प्रक्रियाही सुरू झाली असून टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स आणि हिंदुजा ग्रुप या प्रक्रियेत मुख्य खरेदीदार होण्याच्या रेसमध्ये आहेत.
 

Web Title: anil ambani led reliance capital share huge crash the price came directly to 8 rupees from ₹2770

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.