Lokmat Money >शेअर बाजार > अंबानींच्या या शेअरनं केलं कंगाल, ₹2700 वरून आपटून थेट 9 रुपयांवर आला स्टॉक; आता आली मोठी बातमी

अंबानींच्या या शेअरनं केलं कंगाल, ₹2700 वरून आपटून थेट 9 रुपयांवर आला स्टॉक; आता आली मोठी बातमी

पूर्वी 2700 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करणारा हा शेअर आज 9 रुपयांपर्यंत घसरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 04:28 PM2023-07-03T16:28:02+5:302023-07-03T16:28:55+5:30

पूर्वी 2700 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करणारा हा शेअर आज 9 रुपयांपर्यंत घसरला आहे.

Anil ambani reliance capital share made poor, the stock fell directly from rs 2700 to 9 rupees; Now comes the big news | अंबानींच्या या शेअरनं केलं कंगाल, ₹2700 वरून आपटून थेट 9 रुपयांवर आला स्टॉक; आता आली मोठी बातमी

अंबानींच्या या शेअरनं केलं कंगाल, ₹2700 वरून आपटून थेट 9 रुपयांवर आला स्टॉक; आता आली मोठी बातमी

नवी दिल्ली - मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या एका कंपनीने गुंतवणूकदारांवर अक्षरशः तोंड झोडून घेण्याची वेळ आणली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठे नुकसान होत आहे. पूर्वी 2700 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करणारा हा शेअर आज 9 रुपयांपर्यंत घसरला आहे. या शेअरमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे अडकले असून कंपनीही कर्जात आहे. रिलायन्स कॅपिटल असे या कंपनीचे नाव आहे.

मुळात उद्योगपती अनिल अंबानी होच मोठ्या कर्जाखाली दबलेले आहेत. त्यांची कंपनी रिलायन्स कॅपिटल (RCap) विकली जाणार आहे. कर्जबाजारी असलेल्या रिलायन्स कॅपिटलच्या कर्जदारांनी हिंदुजा समूहाची कंपनी इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लि.तर्फे सादर करण्यात आलेल्या समाधान योजनेच्या बाजूने मतदान केले आहे.

कंपनीने बोलीच्या दुसऱ्या फेरीत सर्वाधिक 9,661 कोटी रुपयांची रोख ऑफर दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, 99 टक्के मते ही इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लि. (IIHL) कडून लावण्यात आलेल्या बोलीच्या बाजूने होती. कारण कर्जदारांना 9,661 कोटी रुपयांच्या रोख रकमेतून कर्ज वसुली होईल अशी आशा आहे.

महत्वाचे म्हणजे, रिलायन्स कॅपिटलच्या शेअर्समध्ये गेल्या शुक्रवारी तेजी दिसून येत आहे. गेल्या शुक्रवारी कंपनीचा शेअर वाढीसह बंद झाला होता. यात 5 टक्के उसळी दिसून आली होती. आजही या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. गुंतवणूकदारांच्या जोरदार खरेदीमुळे आज शेअरला अप्पर सर्किट लागले आहे. हा शेअर आज 5 टक्क्यांच्या वाढीसह 9.75 रुपयांवर पहोटला आहे. 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Anil ambani reliance capital share made poor, the stock fell directly from rs 2700 to 9 rupees; Now comes the big news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.