Reliance Communications Ltd: अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या दिवाळखोरी प्रक्रियेतून जात असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (Reliance Communication Limited) या टेलिकॉम कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी, ४ मार्च रोजी व्यवहार झाला नाही. मात्र, ३ मार्च रोजी जवळपास आठवडाभरानंतर त्याचा व्यवहार झाला. मात्र कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी हा शेअर ५ टक्क्यांनी घसरून १.७१ रुपयांवर बंद झाला. अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या शेअर्सचं २४ फेब्रुवारीपासून ट्रेडिंग झालं नाही. ३ मार्च रोजी याची सुरुवात झाली पण शेअर लोअर सर्किटवर पोहोचले.
रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या शेअरमध्ये या वर्षी आतापर्यंत ११ टक्क्यांची घसरण झाली आहे. सहा महिन्यांत तो २१ टक्क्यांनी तुटलाय. तर एका महिन्यात तो ८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यात वर्षभरात १३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. तर पाच वर्षांत हा शेअर जवळपास १०० टक्क्यांनी वधारलाय. मात्र, दीर्घकाळात यामुळे मोठं नुकसान झालंय. जानेवारी २००८ मध्ये या शेअरनं ८२० रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर त्यात ९९ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदारानं कंपनीत ८२० रुपये दरानुसार ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आतापर्यंत आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर ही रक्कम आज केवळ १०४ रुपयांवर आली असती.
कंपनीचा व्यवसाय काय?
रिलायन्स कम्युनिकेशन्सचं नियंत्रण अनिल अंबानी यांच्याकडे आहे. एकेकाळी रिलायन्स कम्युनिकेशन्स ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम ऑपरेटर होती. मात्र, अनिल अंबानी यांचे बंधू मुकेश अंबानी यांची प्रतिस्पर्धी कंपनी रिलायन्स जिओनं सेवा सुरू केल्यानंतर ती कंपनी आर्थिक संकटात ढकलली गेली. रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचं झालं तर प्रवर्तकाकडे १.८५ टक्के हिस्सा आहे. पब्लिक शेअरहोल्डिंगबद्दल बोलायचं झालं तर यात ९७.३८ टक्के हिस्सा आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)