Join us

99% ने घसरला होता अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर, आता आलीय 2400% ची तूफानी तेजी! करतोय मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 6:05 PM

महत्वाचे म्हणजे, गेल्या काही वर्षांतच, या शेअरने 2400% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे.

शेअर बाजारात अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी आहे. रिलायन्स इन्फ्राचा शेअर बुधवारी 13 टक्क्यांहून अधिकने वाढून 239 रुपयांवर पोहोचला आहे. सध्या कंपनीचा शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकाच्या अगदी जवळ आहे. हा शेअर त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून थेट 99 टक्क्यांहून अधिक घसरला होता. महत्वाचे म्हणजे, गेल्या काही वर्षांत, या शेअरने 2400% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 248.30 रुपये एवढा आहे.

99% घसरला होता शेअर, आता तुफान तेजी -रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर त्यांच्या सर्वकालीन उच्चांकावरून 99 टक्क्यांहून अधिक घसरला होता. हा शेअर 4 जानेवारी 2008 रोजी 2510.35 रुपयांवर होता. जो 27 मार्च 2020 रोजी 9.20 रुपयांपर्यंत घसरला होता. मात्र, गेल्या 4 वर्षांत रिलायन्स इन्फ्राच्या शेअरमध्ये चांगली वाढ झाली असून 14 फेब्रुवारी 2024 रोजी हा शेअर 239 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरने गेल्या 4 वर्षात 2400% हून अधिकचा परतावा दिला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी 114.50 रुपये एवढा आहे. 3 वर्षांत 650% हून अधिकची तेजी -रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरचा शेअर गेल्या 3 वर्षांत 650 टक्क्यांनी वधारला आहे. हा शेअर 19 फेब्रुवारी 2021 रोजी 30.70 रुपयांवर होता. तो आज 14 फेब्रुवारीला 239 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या एका वर्षात रिलायन्स इन्फ्राचा शेअर 95 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर 123.25 रुपयांवरून 239 रुपयांपर्यंत पोहोचला. तसेच गेल्या 6 महिन्यांत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरने 45% हून अधिकचा परतावा दिला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्सशेअर बाजारगुंतवणूक