Join us

९९% घसरुन ₹९ वर पोहोचला हा शेअर, आता २७००% ची आली तेजी; गुंतवणूकदार सुखावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 3:05 PM

सोमवारी कंपनीच्या शेअर्सनं 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. शुक्रवारीही रिलायन्स इन्फ्राच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली होती.

अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स सोमवारी 10 टक्क्यांहून अधिक वाढून 262.20 रुपयांवर पोहोचले. सोमवारी कंपनीच्या शेअर्सनं 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. शुक्रवारीही रिलायन्स इन्फ्राच्या  (Reliance Infra) शेअर्समध्ये चांगली वाढ झाली होती. गेल्या 2 दिवसात कंपनीचे शेअर्स 20% पेक्षा जास्त वाढले आहेत. रिलायन्स इन्फ्राने शुक्रवारी एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितलं होतं की कंपनी आणि रिलायन्स पॉवरनं ICIC बँकेसोबत सेटलमेंट अॅग्रीमेंटवर स्वाक्षरी केली होती. 

99% पेक्षा अधिक घसरण, आता वाढ 

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स त्यांच्या उच्चांकी स्तरावरून 99 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत. गेल्या 4 वर्षांत,अनिल अंबानी यांच्या मालकीच्या या कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे .4 जानेवारी 2008 रोजी रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 2510.35 रुपयांवर होते. 27 मार्च 2020 रोजी कंपनीचे शेअर्स 9.20 रुपयांपर्यंत घसरले. 18 मार्च 2024 रोजी रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 262.20 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 4 वर्षात रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 2750% पेक्षा जास्त वाढले आहेत. 

वर्षभरात 75% पेक्षा अधिक वाढ 

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये वर्षभरात 75% पेक्षा अधिक वाढ झाली आहे. 20 मार्च 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 148.10 रुपयांवर होते. 18 मार्च 2024 रोजी रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 262.20 रुपयांवर पोहोचले आहेत. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत, रिलायन्स इन्फ्राच्या शेअर्समध्ये 47% ची वाढ झाली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 177 रुपयांवरून 262 रुपयांपर्यंत वाढले. या वर्षी आतापर्यंत रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स सुमारे 25% वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 131.40 रुपये आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजाररिलायन्सअनिल अंबानीशेअर बाजार