Anil Ambani Stock: शेअर बाजारात बुधवारी ग्रीन झोनमध्ये व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटांतच गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे शेअर बाजारात घसरण दिसून आली. दरम्यान, अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये ११ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. आजच्या व्यवहारात रिलायन्स पॉवरचा शेअरनं ४१.४० रुपयांवर दिवसाचा उच्चांकी स्तर गाठला आहे, तर मंगळवारी हा शेअर ३७.२५ रुपयांवर बंद झाला होता. कामकाजाच्या अखेरिस हा शेअर ३९.३९ रुपयांवर बंद झाला. हा शेअर २६१ रुपयांच्या उच्चांकी पातळीवरुन घसरून १ रुपयाच्या पातळीवर घसरला होता.
११ रुपयांची तेजी
बुधवारी ११ टक्क्यांची मोठी तेजी असूनही हा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी ५४.२५ रुपयांवरून २४ टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तो ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता, जो ५२ आठवड्यांच्या नीचांकी २३.२६ रुपयांच्या जवळपास दुप्पट होता. मात्र, रिलायन्स पॉवरचा शेअर मार्चमध्ये आतापर्यंत २४ टक्क्यांनी वधारलाय.
५ वर्षात ३०००% पेक्षा जास्त परतावा
गेल्या पाच दिवसांत पेनी शेअरमध्ये ४.९१ टक्के वाढ झाली आहे, तर महिन्याभरात त्यात सुमारे २४ टक्के वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांनी ६ महिन्यांत ४ टक्क्यांचं नुकसान केलाय, तर एका वर्षात त्यांनी सुमारे ४७ टक्के परतावा दिला आहे. पाच वर्षांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्यानं आपल्या भागधारकांना बंपर नफा दिलाय. या कालावधीत कंपनीनं ३,३३५ टक्के नफा झालाय.
डिसेंबर तिमाहीचे निकाल
आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला ४१.९५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १,१३६.७५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्याचबरोबर कंपनीचा खर्चही डिसेंबर २०२३ तिमाहीतील ३,१६७.४९ कोटी रुपयांवरून ३३ टक्क्यांनी घसरून २,१०९.५६ कोटी रुपयांवर आला आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)