Lokmat Money >शेअर बाजार > अनिल अंबानींच्या कंपनीला ₹२८७८ कोटींचा नफा; यापूर्वी तोट्यात होती कंपनी; ₹३६ वर आला शेअर

अनिल अंबानींच्या कंपनीला ₹२८७८ कोटींचा नफा; यापूर्वी तोट्यात होती कंपनी; ₹३६ वर आला शेअर

Anil Ambani Reliance Power : कंपनीचे शेअर्स आज बुधवारी व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होते. कंपनीच्या शेअर्सना आज ५ टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 04:29 PM2024-11-13T16:29:33+5:302024-11-13T16:29:33+5:30

Anil Ambani Reliance Power : कंपनीचे शेअर्स आज बुधवारी व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होते. कंपनीच्या शेअर्सना आज ५ टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं.

Anil Ambani's company profits ₹2878 crore; The company was previously loss-making; The share went up to ₹36 | अनिल अंबानींच्या कंपनीला ₹२८७८ कोटींचा नफा; यापूर्वी तोट्यात होती कंपनी; ₹३६ वर आला शेअर

अनिल अंबानींच्या कंपनीला ₹२८७८ कोटींचा नफा; यापूर्वी तोट्यात होती कंपनी; ₹३६ वर आला शेअर

Anil Ambani Reliance Power : रिलायन्स पॉवरचे शेअर्स आज बुधवारी व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होते. कंपनीच्या शेअर्सना आज ५ टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं. मात्र, कंपनीचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल जबरदस्त ठरले आहेत. रिलायन्स पॉवरला चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत २,८७८.१५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झालाय. गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) कंपनीला २३७.७६ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता.

कंपनीनं काय म्हटलं?

रिलायन्स पॉवरने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, समीक्षाधीन तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न कमी होऊन १,९६२.७७ कोटी रुपयांवर आलं आहे. उपकंपनी बरखास्त झाल्यानं कंपनीला ३,२३०.४२ कोटी रुपयांचा नफा झाला.

जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी रिलायन्स पॉवरनं आपली उपकंपनी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडची (व्हीआयपीएल) ३,८७२ कोटी रुपयांची गॅरंटरची थकबाकी भरली आहे. रिलायन्स पॉवर लिमिटेड ही अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाची भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीची वीज निर्मिती आणि कोळसा प्रक्रिया कंपनी आहे.

शेअर्सची स्थिती काय?

आज, बुधवारी रिलायन्स पॉवरच्या शेअर्सनं ५% च्या लोअर सर्किटला धडक दिली असून कंपनीचा शेअर ३६.४६ रुपयांवर आला आहे. गेल्या पाच दिवसांत या शेअरमध्ये २० टक्के घसरण झाली आहे. २७ मार्च २०२० रोजी शेअरची किंमत १.१५ रुपये होती. मात्र, २३ मे २००८ मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत २७४ रुपये होती. म्हणजेच २००८ ते २०२० या काळात या शेअरमध्ये ९९ टक्क्यांची घसरण झाली होती. रिलायन्स पॉवरच्या शेअर्सनं गेल्या पाच वर्षांत ८१५ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. या दरम्यान त्याची किंमत ४ रुपयांवरून सध्याच्या किंमतीपर्यंत वाढली. वर्षभरात या शेअरमध्ये ६२ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Anil Ambani's company profits ₹2878 crore; The company was previously loss-making; The share went up to ₹36

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.