Anil Ambani Share Price : काही काळापासून आर्थिक अडचणीत आलेले उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपन्यांचे शेअर हळुहळू वाढत आहेत. आता आजदेखील अनिल अंबानींच्या कंपनीच्या शेअर्सला अपर सर्किट लागला. विशेष म्हणजे, हा स्टॉक त्याच्या सर्वोच्च पातळीपासून 99% पडल्यानंतर, आता काही काळापासून वाढत आहे. आम्ही ज्या कंपनीबद्दल बोलत आहोत, ती रिलायन्स पॉवर आहो. हा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. या स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीहून अधिक केले आहेत. या शेअरची किंमत 1 रुपयांच्या आसपास आली होती, मात्र आता ती 41 रुपयांच्या पुढे गेली आहे.
स्टॉक मार्केटच्या तेजीमध्ये स्टकॉ रॉकेट बनला
शेअर बाजारातील तेजीचा कल बुधवारीही कायम राहिला आहे. एकीकडे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स पुन्हा एकदा 81,000 च्या पुढे सरकला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही वेगाने धावत आहे. दरम्यान, अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्सने बाजार उघडताच अपर सर्किट मारले आणि 41.09 रुपयांवर पोहोचला. शेअर्सच्या वाढीमुळे कंपनीच्या बाजार भांडवलावरही परिणाम झाला असून, हे 16510 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.
शेअर्स वाढण्यामागे हे आहे कारण
रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये या वाढीमागील कारणांबद्दल सांगायचे तर, अनिल अंबानी यांना सार्वजनिक क्षेत्रातील सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SECI) कडून मोठा दिलासा मिळाला आहे. रिलायन्स पॉवरला बजावलेली बंदीची नोटीस मागे घेण्यात आली आहे. यानंतर कंपनी आता SECI च्या भविष्यातील निविदांमध्ये भाग घेऊ शकणार आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, SECI देशातील अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी नोडल एजन्सी म्हणून काम करते. गेल्या नोव्हेंबरमध्ये बनावट कागदपत्रांच्या प्रकरणी कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि तीन वर्षांसाठी कोणत्याही निविदांमध्ये भाग घेण्यास मनाई केली होती.
कंपनीचे शेअर्स 99 टक्क्यांनी घसरले...
अनिल अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स आतापर्यंतच्या उच्च पातळीपासून 99 टक्क्यांनी घसरले आहेत. 16 मे 2008 रोजी रिलायन्स पॉवरचे शेअर्स 260.78 रुपये प्रति शेअर होते, तेथून ते झपाट्याने घसरले आणि मार्च 2020 मध्ये ते 1 रुपयांपर्यंत आले. परंतु त्यानंतर स्टॉक पुन्हा रिकव्हरी मोडमध्ये आला आणि आता त्याची सातत्याने वाढ होत आहे.
रु. 1 वर 3573% ने झेप घेतली
अनिल अंबानींचा हा पॉवर स्टॉक त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर स्टॉक ठरला आहे. या स्टॉकमध्ये गुंतवलेल्या पैशाची रक्कम एका वर्षात 98% परताव्यासह जवळपास दुप्पट झाली आहे. तर मार्च 2020 पासून या शेअरची किंमत 3573% वाढली आहे. 27 मार्च 2020 रोजी या स्टॉकची किंमत फक्त 1.17 रुपये होती, तेव्हापासून आतापर्यंत याने मल्टीबॅगर परतावा दिला आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने 27 मार्च 2020 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असते, तर त्याची रक्कम 35,73000 रुपये झाली असती.
रिलायन्स पॉवर काय करते?
रिलायन्स पॉवर लिमिटेड ही अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाची कंपनी आहे. रिलायन्स समूह आर्थिक सेवा, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा यासह अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. तर रिलायन्स पॉवर भारतातील वीज प्रकल्पांच्या विकासासाठी, बांधकामासाठी आणि ऑपरेशनसाठी काम करते. त्यात काही उपकंपन्याही आहेत. कंपनीकडे सुमारे 6000 मेगावॅटची कार्यरत वीज निर्मिती मालमत्ता आहे.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)