एक छोटी कंपनी एसजी मार्ट (SG Mart) आपल्या गुंतवणूकदारांना मोठी भेट देणार आहे. कंपनीनं बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट देण्याची घोषणा केली आहे. एसजी मार्ट आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स देत आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक शेअरमागे 1 बोनस शेअर देत आहे. यासह, कंपनी 1:10 च्या प्रमाणात शेअर्स देणार आहे. कंपनीनं अद्याप बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. एसजी मार्टच्या शेअर गुरुवारी 11148.05 रुपयांचं अपर सर्किट लागलं.
100 रुपयांवरुन पोहोचले 11000 रुपयांवरएसजी मार्टच्या शेअरमध्ये गेल्या ३ वर्षात मोठी तेजी दिसून आली आहे. कंपनीचे शेअर 3 वर्षांत 10635 टक्क्यांनी वधारले. कंपनीचे शेअर्स 12 फेब्रुवारी रोजी 103.85 रुपयांवर होते. एसजी मार्टचे शेअर्स 11 जानेवारी 2024 रोजी 11148.05 रुपयांवर पोहोचेल. कंपनीच्या शेअर्सचा ही एका वर्षाची उच्चांकी पातळी आहे. एसजी मार्टच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 342.95 रुपये आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 2451 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 436.95 रुपयांवरुन वाढून 11148.05 रुपयांपर्यंत पोहोचलेत. तर गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 391 टक्क्यांची तेजी आली आहे.
दोन दिग्गजांची गुंतवणूकदिग्गज गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल आणि माधुरी मधुसुदन केला यांनी प्रेफरन्शीअल इश्यूद्वारे एसजी मार्टमध्ये अनुक्रमे 30000 आणि 20000 शेअर्स खरेदी केलेत. 5000 रुपयांच्या इश्यू प्राईजवर त्यांनी हे शेअर्स खरेदी केले. त्यांच्याशिवाय अन्य 88 नॉन प्रमोटर्सनादेखील शेअर्स अलॉट करण्यात आलेत. कंपनीचा प्रेफरन्शिअल इश्यू एकूण 1577000 शेअर्सचा होता.