Join us

TATAच्या आणखी एका कंपनीचा येणार IPO, केव्हा करता येईल गुंतवणूक; जाणून घ्या संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 8:50 AM

तुम्ही टाटांच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची लावण्याची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Big Basket IPO: तुम्ही टाटांच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची लावण्याची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. खरं तर, टाटा समूहाच्या मालकीची ऑनलाइन किराणा कंपनी 'बिग बास्केट' नफ्यात आल्यानंतर २०२५ मध्ये आयपीओ (IPO) लॉन्च करण्याचा विचार करत आहे. कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. बिग बास्केट ही टाटा डिजिटल कंपनी आहे. २०२१ मध्ये, टाटा डिजिटलनं अलिबाबा (Alibaba) आणि अॅक्टिस (Actis) सारख्या गुंतवणूकदारांच्या बाहेर पडल्यानंतर बिग बास्केटमधील ६४ टक्क्यांहून अधिक भागभांडवल विकत घेतलं. 

बिग बास्केटचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी हरी मेनन म्हणाले की, कंपनी पुढील ६-८ महिन्यांत नफ्यात येईल. कंपनीचा नवीन ऑफर 'बीबी नाऊ' सेगमेंट पैसे कमवायला सुरुवात करेल. जेव्हा त्यांना आयपीओ योजनांबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की आम्ही कदाचित २०२५ मध्ये आयपीओ आणू. पण आम्ही तो निर्णय टाटांवर सोडत आहोत, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी त्यांच्यापेक्षा चांगलं कोणीही असू शकत नाही. 

गेल्या वर्षी आलेला आयपीओ 

टाटांची कंपनी टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ नोव्हेंबर २०२३ मध्ये आला होता. हा आयपीओ ३० नोव्हेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाला होता. टाटा समूहाचा हा शेअर बीएसईवर ११९९.९५ रुपयांवर १४० टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स १४० टक्क्यांच्या प्रीमियमसह एनएसईवर १,२०० रुपयांवर लिस्ट झाले. या आयपीओचा प्राईज बँड ४७५-५०० रुपये निश्चित करण्यात आली होता. 

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

टॅग्स :टाटाइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार