Lokmat Money >शेअर बाजार > 'या' कंपनीने केले मालामाल; 9 महिन्यात 1800 वरुन 5700 वर गेला शेअर

'या' कंपनीने केले मालामाल; 9 महिन्यात 1800 वरुन 5700 वर गेला शेअर

Multibagger Stock: या मल्टीबॅगर शेअर्सने गुंतवणूकदारांना बंपर कमाई करुन दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 04:47 PM2023-09-26T16:47:07+5:302023-09-26T16:48:15+5:30

Multibagger Stock: या मल्टीबॅगर शेअर्सने गुंतवणूकदारांना बंपर कमाई करुन दिली आहे.

Apar Industries share went from 1800 to 5700 in 9 months | 'या' कंपनीने केले मालामाल; 9 महिन्यात 1800 वरुन 5700 वर गेला शेअर

'या' कंपनीने केले मालामाल; 9 महिन्यात 1800 वरुन 5700 वर गेला शेअर

Apar Industries Ltd: शेअर मार्केटमध्ये काही मल्टीबॅगर शेअर्स असतात, जे गुंतवणूकदारांना अल्पावधीत बंपर कमाई करुन देतात. असाच एक मल्टीबॅगर स्टॉक Apar Industries Ltd चा आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. आजही कंपनीचा शेअर 4.88 टक्क्यांनी वाढला. 

कंपनीने निधी उभारल्याची बातमी समोर आल्यानंतर कंपनीचे शेअर्स रॉकेट बनले आहेत. कंपनीने सांगितले होते की, निधी उभारणीच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी 28 सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. आज कंपनीचा शेअर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 5,704.45 च्या पातळीवर आहे.

एका वर्षात 350 टक्क्यांनी वाढ
गेल्या 3 वर्षात कंपनीचा स्टॉक 1853 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 350.23 टक्के म्हणजेच 4,437.45 रुपयांची वाढ झाली आहे. YTD मध्ये कंपनीच्या शेअरमध्ये 212.71 टक्के म्हणजेच 3,880.25 रुपयांची वाढ झाली. 2 जानेवारी रोजी कंपनीचा शेअर 1824 रुपयांच्या पातळीवर होता आणि गेल्या 9 महिन्यांत शेअर्स 5,704.45 च्या पातळीवर पोहोचले आहेत.

जून तिमाहीत कंपनीला निव्वळ नफा 
कंपनीने जून तिमाहीत निव्वळ नफ्यात 61 टक्क्यांची वाढ नोंदवली. कंपनीने जून 2023 तिमाहीत एकूण उत्पन्नात 22.25 टक्के वाढ नोंदवून, जून 2022 तिमाहीत 3097 कोटी रुपयांच्या तुलनेत 3786 कोटी रुपये झाली आहे. पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा जून 2022 च्या तिमाहीत 122.46 कोटी रुपयांच्या तुलनेत 61.22 टक्क्यांनी वाढून 197.43 कोटी रुपये झाला आहे.

कंपनीचा व्यवसाय काय आहे?
अपार इंडस्ट्रीज लिमिटेड कंडक्टर, विविध प्रकारच्या केबल्स, विशेष तेल, पॉलिमर यांचा निर्माता आणि पुरवठादार आहे. याशिवाय, कंपनीच्या विभागांमध्ये कंडक्टर, ट्रान्सफॉर्मर, पॉवर आणि टेलिकॉमचा समावेश आहे.

(डिस्‍क्‍लेमर: इथे आम्ही तुम्हाला शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती दिली आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Web Title: Apar Industries share went from 1800 to 5700 in 9 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.