शेअर बाजारात शुक्रवारी तेजी पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ९० दिवसांसाठी शुल्काला स्थगिती दिल्यानंतर बुधवारी रात्री अमेरिकी बाजारात ७ टक्क्यांहून अधिक उसळी आली. गुरुवारी भारतीय शेअर बाजार बंद असला तरी शुक्रवारी त्यात जोरदार तेजी दिसून आली.
दुपारी १२ वाजता बीएसई सेन्सेक्स २ टक्क्यांच्या वाढीसह ७५,२८५ वर व्यवहार करत होता, तर निफ्टी ४७० अंकांच्या वाढीसह २२,८७० वर व्यवहार करत होता. बीएसईवरील सर्व लिस्टेड कंपन्यांचं बाजार भांडवल ७.५ लाख कोटी रुपयांनी वाढून ४०१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
दागिने गहाण ठेवून बँकेतून कर्ज घेणं आता होणार कठीण, RBI का बदलायच्या तयारीत आहे Gold Loan चे नियम?
बाजारातील तेजीची कारणं
टॅरिफमधून दिलासा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह ७५ देशांवरील अतिरिक्त शुल्क ९ जुलैपर्यंत पुढे ढकलल्यानंतर गुंतवणूकदारांची धारणा सुधारली. वाढत्या जागतिक व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या तात्पुरत्या दिलासामुळे बाजाराला दिलासा मिळाला आहे. भारताला कोळंबी आणि पोलाद या सारख्या निर्यातीवर मोठ्या प्रमाणात शुल्काचा सामना करावा लागला होता, परंतु शुल्क थांबल्यानं तात्काळ व्यापार विस्कळीत होण्याची भीती कमी होण्यास मदत झाली आहे.
डॉलरची घसरण
अमेरिकी डॉलरमध्ये सातत्यानं होत असलेल्या घसरणीमुळे भारतासह उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. कमकुवत डॉलरमुळे सामान्यत: भारतीय शेअर बाजारात परकीय गुंतवणूक मजबूत होते आणि रुपयावरील दबाव कमी होतो.
शुक्रवारी डॉलर निर्देशांक जुलै २०२३ नंतर प्रथमच १०० च्या खाली घसरला. स्विस फ्रँकच्या तुलनेत डॉलर १० वर्षांतील नीचांकी आणि येनच्या तुलनेत सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला. यामुळे जागतिक गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता सुधारली असून धातूंसारख्या क्षेत्रातील तेजीला आधार मिळाला आहे.
देशांतर्गत शेअर बाजारातील दमदार कामगिरी आणि कमकुवत डॉलरमुळे भारतीय रुपया सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ५१ पैशांनी वधारून ८६.१७ वर पोहोचला.
डॉलरच्या कमकुवत झाल्यानं निफ्टी मेटल निर्देशांक ३ टक्क्यांहून अधिक वधारला, ज्यामुळे डॉलर-मूल्यांकित वस्तू अधिक आकर्षक बनल्या आणि निर्यातदारांसाठी मार्जिन वाढलं.
रेपो दरकपातीचा परिणाम
रिझर्व्ह बँकेने बुधवारी व्याजदरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात केली होती, पण बाजारातील कमकुवत भावना आणि दरांच्या चिंतेमुळे बाजाराला आरबीआयच्या या दिलासाच्या आनंद साजरा करण्याची संधी मिळाली नाही. मात्र शुक्रवारी कामकाजादरम्यान याचा परिणाम दिसून आला.
स्टॉक स्पेसिफिक अप्रोच
स्टॉक स्पेसिफिक ट्रिगर्सदरम्यान जोरदार खरेदीमुळे निफ्टी फार्मामध्येही ३ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. निफ्टी ऑटो अँड हेल्थकेअर २ टक्क्यांहून अधिक वधारले, तर फायनान्शियल सर्व्हिसेस, आयटी आणि ऑईल अँड गॅस १ ते २ टक्क्यांनी वधारले. दरम्यान, भारताचा वॉलेटॅलिटी इंडेक्स (India VIX) ४.६ टक्क्यांनी घसरून २०.४४ वर आला आहे.