Join us

₹७ वरुन ₹१०८ वर आला 'हा' डिफेन्स स्टॉक; कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, रॉकेट बनला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 2:03 PM

Apollo Micro Systems share price : कंपनीचे शेअर्स बुधवारी ट्रेडिंगदरम्यान फोकसमध्ये होते. शेअर्समधील या तेजीमागे एका ऑर्डरची बातमी आहे.

Small Cap Stock: अपोलो मायक्रो सिस्टीम्सचे (Apollo Micro Systems share price) शेअर्स बुधवारी ट्रेडिंगदरम्यान फोकसमध्ये होते. कंपनीचा शेअर आज व्यवहारादरम्यान ३.२ टक्क्यांनी वधारून १०८.३५ रुपयांवर पोहोचला. शेअर्समधील या तेजीमागे एका ऑर्डरची बातमी आहे. खरं तर डिफेन्स कंपनीला भारत डायनॅमिक्सकडून १०.९० कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. या बातमीनंतर स्मॉलकॅप डिफेन्स स्टॉक अपोलो मायक्रो सिस्टीम्सचा शेअर बीएसईवर ३ टक्क्यांनी वधारून १०८ रुपयांवर पोहोचला.

कंपनीनं काय म्हटलं?

भारत डायनॅमिक्सकडून मिळालेली ही ऑर्डर अधिक वजनाच्या टोरपॅडोसाठी सॉफ्टवेअर डिफाइंड युनिव्हर्सल होमिंग सिस्टमसाठी असल्याचं अपोलो मायक्रो सिस्टम्सनं सांगितलं. 'सध्याची प्रोडक्शन ऑर्डर अधिक वजनाच्या टोरपॅडोच्या मोट्या आवश्यकतेची सुरुवात आहे. याचा वापर सर्व रणनितीक पाणबुड्यांवर केला जाईल. आम्ही मोठ्या प्रमाणातील मागणी पूर्ण करण्यासाठी तयार आहोत. हैदराबादच्या हार्डवेअर पार्कमध्ये आमचं युनिट III सुविधा फेब्रुवारी २०२५ पासून कार्यरत होईल,' असं कंपनीनं जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलंय.

काय आहे शेअरची स्थिती?

अपोलो मायक्रो सिस्टीम्सच्या शेअरची किंमत गेल्या महिन्याभरात १२ टक्क्यांनी आणि वार्षिक आधारावर (वायटीडी) ६ टक्क्यांहून अधिक घसरली आहे. मात्र, स्मॉलकॅप डिफेन्स शेअरनं एका वर्षात ९४ टक्के आणि तीन वर्षांत ८२५ टक्क्यांहून अधिक मल्टीबॅगर परतावा दिला आहे. पाच वर्षांत हा शेअर १३०० टक्क्यांहून अधिक वधारला आहे. पाच वर्षांपूर्वी या शेअरची किंमत ७ रुपये होती.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारसंरक्षण विभागगुंतवणूक