Lokmat Money >शेअर बाजार > टायर तयार करणाऱ्या या कंपनीनं दिला 270 टक्क्यांचा बम्पर परतावा, गुंतवणूकदार मालामाल

टायर तयार करणाऱ्या या कंपनीनं दिला 270 टक्क्यांचा बम्पर परतावा, गुंतवणूकदार मालामाल

आयसीआयसीआय डायरेक्टनुसार, दिवाळीत अर्थात मुहूर्त ट्रेडिंगमध्ये शेअरची किंमत 335 रुपयांपर्यंत जाऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 08:59 PM2022-10-14T20:59:05+5:302022-10-14T21:00:25+5:30

आयसीआयसीआय डायरेक्टनुसार, दिवाळीत अर्थात मुहूर्त ट्रेडिंगमध्ये शेअरची किंमत 335 रुपयांपर्यंत जाऊ शकते.

Apollo Tyres tire manufacturing company has given a bumper return of 270 percent, investor wealth | टायर तयार करणाऱ्या या कंपनीनं दिला 270 टक्क्यांचा बम्पर परतावा, गुंतवणूकदार मालामाल

टायर तयार करणाऱ्या या कंपनीनं दिला 270 टक्क्यांचा बम्पर परतावा, गुंतवणूकदार मालामाल

कोरोना काळात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अशीच एक कंपनी टायर बनवणारी कंपनी म्हणजे अपोलो टायर्स (Apollo Tyres) आहे. याकंपनीने कोरोना काळात गुंतवणूकदारांची संपत्ती जवळपास 4 पट वाढवली आहे. आयसीआयसीआय डायरेक्टच्या मते, या स्टॉकचा भाव येणाऱ्या काही काळातच 300 रुपयांपर्यंत पोहोचेल.

शेअरची स्थिती -  
देशात लॉकडाउन लागू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच साधारणपणे 23 मार्च, 2020 रोजी अपोलो टायर्सच्या शेअरची किंमत 73 रुपयांच्या पातळीवर होती. तो आता 270 रुपयांच्याही वर गेला आहे. या कालावधीत शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 268.25% एवढा परदावा दिला आहे. तसेच, कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 17,201.71 कोटी रुपये आहे. अपोलो टायर्सची 52-आठवड्यांतील उच्च पातळी 303.40 रुपये आहे. तसेच तो 165.40 रुपयांच्या निच्चांकी पातळीवरही गेला आहे.

मुहूर्त ट्रेडिंगनंतर परफॉर्मन्स -
आयसीआयसीआय डायरेक्टनुसार, दिवाळीत अर्थात मुहूर्त ट्रेडिंगमध्ये शेअरची किंमत 335 रुपयांपर्यंत जाऊ शकते. गेल्या 4 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या मुहूर्त ट्रेडिंगच्या तुलनेत आतापर्यंत अपोलो टायर्सच्या शेअर्समध्ये जवळपास 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. या दिवाळीला मुहूर्त ट्रेडिंग 24 ऑक्टोबरच्या सायंकाळी असेल. तसेच, कंपनीने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 3.25 रुपये प्रति शेअरनुसार, तब्बल 325 टक्यांचा लाभांश दिला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Apollo Tyres tire manufacturing company has given a bumper return of 270 percent, investor wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.