Join us  

ब्रोकरेजची नजर पडताच 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी; एका रिपोर्टच्या आधारे गुंतवणूकदार बुलिश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 2:34 PM

Aadhar Housing Finance Share : कंपनीचा शेअर मंगळवारी ९ टक्क्यांनी वधारला आणि ४२४ रुपयांवर पोहोचला होता. ब्रोकरेजच्या रिपोर्टनंतर या शेअरमध्ये ही वादळी तेजी पाहायला मिळत आहे.

Aadhar Housing Finance Share : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा देत मालामाल केलंय. तसंच असेही अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलंय. मंगळवारी, कामकाजादरम्यान गुंतवणूकदार आधार हाऊसिंग फायनान्सच्या शेअरवर बुलिश दिसून येत आहेत. आधार हाऊसिंग फायनान्सचा शेअर मंगळवारी ९ टक्क्यांनी वधारला आणि ४२४ रुपयांवर पोहोचला होता. ब्रोकरेजच्या रिपोर्टनंतर या शेअरमध्ये ही वादळी तेजी पाहायला मिळत आहे.

कोटक सिक्युरिटीजनं आधार हाऊसिंग फायनान्सवर बुलिश कव्हरेज सुरू केलं आहे. ब्रोकरेज हाऊसनं आपल्या रिपोर्टमध्ये या कंपनीला २० टक्के ग्रोथ ट्रेजेक्टेरीसोबत मोठा प्लेअर मानलंय. ब्रोकरेजनं हाऊसिंग फायनान्स कंपनीवर कव्हरेज सुरू केलंय. आधार हाऊसिंग फायनान्सनं ३००० कोटी रुपयांच्या उभारणासाठी मे २०२४ मध्ये आयपीओ आणला होता.

काय म्हटलंय रिपोर्टमध्ये?

आधार हाऊसिंग फायनान्सच्या विस्तार आणि व्हॅल्युएशन स्ट्रॅटजीमुळे आर्थिक वर्ष २०२४-२७ दरम्यान कमी क्रेडिट कॉस्टसह २१% एयूएम सीएजीआर वाढेल. स्थिर मार्जिन आणि चांगले लिव्हरेज आरओईला उच्च पातळीवर परत आणेल, असं कोटक सिक्युरिटीजनं आपल्या अहवालात म्हटलंय. आधारचे लोन बुक अधिक वैविध्यपूर्ण आहे. उत्तर प्रदेश या सर्वात मोठ्या राज्यात याचा वाटा केवळ १५ टक्के आहे, तर होम फर्स्टच्या तुलनेत गुजरातमध्ये यांचा लोन बुक हिस्सा ३१ टक्के आहे, असंही त्यांनी नमूद केलंय.

आधार हाऊसिंग फायनान्स शेअर प्राइस टार्गेट

कोटक सिक्युरिटीजने आधार हाऊसिंग फायनान्सच्या शेअरसाठी ५५० रुपयांची टार्गेट प्राईज ठेवली आहे. ही किंमत सध्याच्या ट्रेडिंग किमतीपेक्षा ४१% ची वाढ दर्शवते. आधार हाऊसिंग फायनान्सचं मार्केट कॅप १७,६०४ कोटी रुपये आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ४८६.९५ रुपये, तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २९२ रुपये आहे. कंपनीचा निफ्टी आयपीओ इंडेक्समध्ये समावेश करण्यात आला आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकइनिशिअल पब्लिक ऑफरिंग