सेलकोर गॅजेट्सच्या (Cellecor Gadgets) शेअर्सने पहिल्याच दिवशी बाजारात कमाल केली आहे. कंपनीचे शेअर्स बाजारात 92 रुपयांना लिस्ट झाले. लिस्टिंग झाल्यानंतर लगेचच सेलकोर गॅजेट्सचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 96.60 रुपयांवर पोहोचले. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअर्सचा प्राईज बँड 87-92 रुपये निश्चित करण्यात आला. कंपनीचे शेअर्स एनएसई एसएमई एक्सचेंजमध्ये लिस्ट झाले. सेलकोर गॅजेट्सच्या शेअर्सचं अलॉटमेंट 25 सप्टेंबर रोजी अंतिम झालं.
कंपनीचा आयपीओ (Cellecor Gadgets IPO) एकूण 116.33 पट सबस्क्राईब झाला होता. कंपनीच्या आयपीओचा रिटेल कोटा 124.08 पट सबस्क्राईब झाला होता. तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा कोटा 176.54 पट सबस्क्राईब झाला होता. तर क्वालिफाईट इन्स्टिट्युशनल बायर्सचा कोटा 57.58 पट सबस्क्राईब झाला होता. आयपीओ आणण्यापूर्वी कंपनीत प्रमोटर्सचा हिस्सा 69.95 टक्के होता. आता तो 51.57 टक्के राहिला आहे.
1200 शेअर्ससाठी बोली
कंपनीचा IPO 15 सप्टेंबर 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला. कंपनीचा आयपीओ 20 सप्टेंबरपर्यंत खुला होता. किरकोळ गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी अर्ज करता येणार होता. कंपनीच्या आयपीओच्या 1 लॉटमध्ये 1200 शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये 110,400 रुपये गुंतवावे लागले. कंपनीच्या इश्यूचा एकूण आकार 50.77 कोटी रुपये होता. कंपनीचे शेअर्स एनएसई एसएमई एक्सचेंजवर लिस्ट झाले आहेत.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)