Lokmat Money >शेअर बाजार > कर्ज उतरताच स्टॉकच्या खरेदीसाठी उडाली झुंबड, ₹11चा हा शेअर बनला रॉकेट; 2 दिवसांत गुंतवणूकदार मालामाल

कर्ज उतरताच स्टॉकच्या खरेदीसाठी उडाली झुंबड, ₹11चा हा शेअर बनला रॉकेट; 2 दिवसांत गुंतवणूकदार मालामाल

महत्वाचे म्हणजे, व्यवहाराच्या केवळ दोन दिवसांतच या शेअरने जवळपास 40 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 02:49 PM2022-12-05T14:49:49+5:302022-12-05T14:50:35+5:30

महत्वाचे म्हणजे, व्यवहाराच्या केवळ दोन दिवसांतच या शेअरने जवळपास 40 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. 

As soon as the debt came down, there was a rush to buy stocks, bajaj hindustan sugar share ₹11 share became a rocket | कर्ज उतरताच स्टॉकच्या खरेदीसाठी उडाली झुंबड, ₹11चा हा शेअर बनला रॉकेट; 2 दिवसांत गुंतवणूकदार मालामाल

कर्ज उतरताच स्टॉकच्या खरेदीसाठी उडाली झुंबड, ₹11चा हा शेअर बनला रॉकेट; 2 दिवसांत गुंतवणूकदार मालामाल

बजाज हिंदुस्थान शुगरच्या (Bajaj Hindustan Sugar) शेअर्समध्ये आज जबरदस्त तेजी दिसून येत आहे. आज, 5 डिसेंबरला सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीचा शेअर 16.30 टक्क्यांनी वाढून 16.05 रुपयांवर पोहोचला आहे. खरे तर, इंट्रा डे ट्रेडमध्ये हा शेअर 20% अपर सर्किटसह 16.20 रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी शुक्रवारीही कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची वाढ होती. महत्वाचे म्हणजे, व्यवहाराच्या केवळ दोन दिवसांतच या शेअरने जवळपास 40 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. 

जाणून घ्या काय आहे कारण? -
बजाज हिंदुस्थान शुगरने कर्जदारांची संपूर्ण थकबाकी भरली आहे. गेल्या आठवड्यात एका निवेदनामध्ये कंपनीने म्हटले होते की, 'आम्ही सर्व कर्जदारांना मुदत कर्जाचे हप्ते (सप्टेंबर 2022 पर्यंत), मुदत कर्जाचे व्याज (नोव्हेंबर 2022 पर्यंत) आणि वैकल्पिकरित्या परिवर्तनीय डिबेंचर (OCD) कूपन (FY 2022 साठी देय) साठीची संपूर्ण देय रक्कम जमा केली आहे.' तसेच कंपनीच्या म्हणण्यानुसार आता आमच्या खात्यात कुठलेही जुने देय नाही.

किती आहे शेअरची किंमत - 
बजाज हिंदुस्तान शुगरच्या शेअरचा भाव शुक्रवारी 20 टक्क्यांचे अपर सर्किट लागल्यानंतर 13.52 रुपयांवर बंद झाला होता. यापूर्वी गुरुवारी शेअरची किंमत 11 रुपयांवर होती. 17 ऑगस्ट रोजी शेअरची किंमत 9 रुपयांच्या खाली होती, हा शेअरचा 52 आठवड्यांतील नीचांक आहे. तसेच, 22 एप्रिल रोजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. आणि त्याची किंमत 22.58 रुपये एवढी होती.

काय आहे कंपनीचा उद्योग? -
Bajaj Hindustan Sugar भारतातील एक अग्रगण्य साखर आणि इथेनॉलची निर्मिती करणारी कंपनी आहे. हिच्या 14 शुगर प्लांटची एकूण ऊस गाळप क्षमता 1,36,000 टीसीडी, तर सहा डिस्टिलरीजमध्ये रोज 800 किलोलीटर औद्योगिक अल्कोहोलचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. तसेच, 449 मेगावॅट वीज उत्पादनाचीही क्षमता आहे.

 

Web Title: As soon as the debt came down, there was a rush to buy stocks, bajaj hindustan sugar share ₹11 share became a rocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.