Lokmat Money >शेअर बाजार > ₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अशोक लेलँडकडूनही काम मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 07:48 PM2024-09-21T19:48:24+5:302024-09-21T19:50:54+5:30

कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अशोक लेलँडकडूनही काम मिळाले आहे.

As soon as the order of rs 600 crore was received, investors flocked to buy interarch building products share the price increased by 14%. | ₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

शेअर बाजारात Interarch Building Products Limited च्या शेअरच्या किंमतीत शुक्रवारी14 टक्क्यांहून अधिकची वाढ दिसून आली. या वाढीमागचे कारण म्हणजे, कंपनीला 2025 या आर्थिक वर्षासाठी मिळालेली 633.50 कोटी रुपयांचे नवी ऑर्डर. या कामानंतर, कंपनीचे ऑर्डर बुक 1350 कोटींच्या वर गेले आहे. कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अशोक लेलँडकडूनही काम मिळाले आहे.

52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला शेअर -
बीएसईमध्ये शुक्रवारी कंपनीचा शेअर 1255 रुपयांवर खुला झाला. यानंतर तो 14 टक्क्यांहून अधिकच्या तेजीसह 1348.30 रुपयांवर बंद झाला. हा कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. बाजार बंद  होताना कंपनीचा शेअर 1325.50 रुपयांवर होता.

केव्हा कुणाकडून मिळाले काम? -
कंपनीला चालू अर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत 341 कोटी रुपयांचे काम मिळाले होते. यात रिलायन्स इंडस्ट्रीकडून मिळालेल्या 114 कोटी रुपयांच्या आणि एमपिन सोलरकडून मिळालेल्या 60 कोटी रुपयांच्या कामाचा समावेश होता. कंपनीला IDVB Recycling, SMCC Construction, टाटा अॅडव्हान्स सिस्टिम्स, ब्रिट लॉजिस्टिक्स, उत्तम भारतकडून काम मिळणार आहे.

दुसऱ्या तिमाहीत कंपनीला आतापर्यंत 293 कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. यात अमारा राजा इंफ्रा कडून 50 कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. याशिवाय अशोक लेलँडकडूनही 26 कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. 

गेल्या महिन्यातच आला होता आयपीओ -
Interarch Building Products चा आयपीओ गेल्या 19 ऑगस्ट 2024 मध्ये खुला झाला होता. तो 21 ऑगस्टपर्यंत खुला होता. आयपीओच्या वेळी कंपनीचा प्राइस बँड 850 रुपये ते 900 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. कंपनीने 16 शेअर्सचा एक लॉट ठेवला होता. यामुळे गुंतवणूकदाराला किमान 14,400 रुपयांचा डाव लावणे अनिवार्य होते. कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 179.49 कुटू रुपये जमवले होते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: As soon as the order of rs 600 crore was received, investors flocked to buy interarch building products share the price increased by 14%.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.