Join us

शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 10:05 AM

Share Market Opening 4 October : शुक्रवारी शेअर बाजारात किरकोळ वाढीसह व्यवहाराला सुरुवात झाली. मात्र यानंतर प्रॉफिट बुकिंग दिसून आलं आणि त्यानंतर शेअर बाजारात घसरण झाली.

Share Market Opening 4 October : शुक्रवारी शेअर बाजारात किरकोळ वाढीसह व्यवहाराला सुरुवात झाली. मात्र यानंतर प्रॉफिट बुकिंग दिसून आलं आणि त्यानंतर शेअर बाजारात घसरण झाली. निफ्टी ६८ अंकांच्या घसरणीनंतर २५१८२ वर उघडला, तर सेन्सेक्स ८२२४४ वर व्यवहार करत होता आणि या काळात त्यात २८३ अंकांची घसरण झाली.

बाजार उघडताच निफ्टीने २५२८७.९० ची दिवसाची उच्चांकी पातळी गाठली, पण या पातळीवर पुन्हा प्रॉफिट बुकिंग दिसून आलं आणि निफ्टीने २५१४८ ची दिवसाची नीचांकी पातळी पाहिली. 

सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी ५० निर्देशांकातून ओएनजीसी, एसबीआय लाइफ, टीसीएस, एचडीएफसी लाइफ सारख्या शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे. तर बीपीसीएल, बजाज फायनान्स, ट्रेंट, एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ यामुळे कमकुवत जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत बाजारात २ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

"भू-राजकीय अनिश्चितता आणि परकीय गुंतवणुकीत संभाव्य घट होण्याची भीती यामुळे बाजारात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. निफ्टीने अनेक सपोर्ट लेव्हल ओलांडल्यानं, २० डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज (डीईएमए) २५,५८० च्या आसपास आणि ट्रेंडलाइन सपोर्ट २५,३५० च्या आसपास - बाजारात आणखी घसरण दिसून येऊ शकते," अशी प्रतिक्रिया रेलिगेअर ब्रोकिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) अजित मिश्रा यांनी दिली.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक