Lokmat Money >शेअर बाजार > आली कमाईची संधी, हुकवू नका; पुढील सप्ताहात आणखी घसरणीची शक्यता

आली कमाईची संधी, हुकवू नका; पुढील सप्ताहात आणखी घसरणीची शक्यता

परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारातून गुंतवणूक काढून घेण्याला सुरूवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 06:12 AM2024-04-22T06:12:53+5:302024-04-22T06:13:52+5:30

परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारातून गुंतवणूक काढून घेण्याला सुरूवात केली आहे.

As the market fell last week, shares of many good companies are available at attractive valuations | आली कमाईची संधी, हुकवू नका; पुढील सप्ताहात आणखी घसरणीची शक्यता

आली कमाईची संधी, हुकवू नका; पुढील सप्ताहात आणखी घसरणीची शक्यता

 प्रसाद गो. जोशी

जागतिक पातळीवरचा तणाव, परकीय वित्तसंस्थांची विक्री यामुळे गतसप्ताहात बाजार घसरल्याने  अनेक चांगल्या कंपन्यांचे समभाग आकर्षक मूल्याला उपलब्ध आहेत. आगामी सप्ताहामध्ये बाजार काही प्रमाणात खाली जाण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी  खरेदी 
करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. 

गतसप्ताहात टीसीएस, इन्फोसिस यांच्या निकालाने बाजाराची निराशा झाल्याचे दिसून आले. इराण-इस्त्रायल संघर्षामुळे चिंतेचे वातावरण होते. जोडीलाच परकीय वित्तसंस्थांनी विक्री केल्याने सर्वच क्षेत्रांमधील शेअर्स घसरले. अखेरच्या दिवशी काही प्रमाणात बाजार सुधारला.

परकीय वित्तसंस्थांकडून विक्री

परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारातून गुंतवणूक काढून घेण्याला सुरूवात केली आहे. १९ एप्रिलपर्यंत या संस्थांनी भारतीय बाजारातून ५२५४ कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. भारत व मॉरिशसने दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी करारात बदल केले आहेत. मात्र याचा लाभ मॉरिशसशिवाय अन्य देशातील नागरिकांना मिळू नये, अशी तरतूद आहे. मॉरिशसमधून भारतामध्ये होणाऱ्या गुंतवणुकीत अन्य देशाच्या नागरिकांचा पैसा मोठ्या प्रमाणात असल्याने वित्तसंस्थांनी विक्री सुरु ठेवली आहे. 

 

Web Title: As the market fell last week, shares of many good companies are available at attractive valuations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.