Join us

आली कमाईची संधी, हुकवू नका; पुढील सप्ताहात आणखी घसरणीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 6:12 AM

परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारातून गुंतवणूक काढून घेण्याला सुरूवात केली आहे.

 प्रसाद गो. जोशी

जागतिक पातळीवरचा तणाव, परकीय वित्तसंस्थांची विक्री यामुळे गतसप्ताहात बाजार घसरल्याने  अनेक चांगल्या कंपन्यांचे समभाग आकर्षक मूल्याला उपलब्ध आहेत. आगामी सप्ताहामध्ये बाजार काही प्रमाणात खाली जाण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी  खरेदी करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. 

गतसप्ताहात टीसीएस, इन्फोसिस यांच्या निकालाने बाजाराची निराशा झाल्याचे दिसून आले. इराण-इस्त्रायल संघर्षामुळे चिंतेचे वातावरण होते. जोडीलाच परकीय वित्तसंस्थांनी विक्री केल्याने सर्वच क्षेत्रांमधील शेअर्स घसरले. अखेरच्या दिवशी काही प्रमाणात बाजार सुधारला.

परकीय वित्तसंस्थांकडून विक्री

परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारातून गुंतवणूक काढून घेण्याला सुरूवात केली आहे. १९ एप्रिलपर्यंत या संस्थांनी भारतीय बाजारातून ५२५४ कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. भारत व मॉरिशसने दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी करारात बदल केले आहेत. मात्र याचा लाभ मॉरिशसशिवाय अन्य देशातील नागरिकांना मिळू नये, अशी तरतूद आहे. मॉरिशसमधून भारतामध्ये होणाऱ्या गुंतवणुकीत अन्य देशाच्या नागरिकांचा पैसा मोठ्या प्रमाणात असल्याने वित्तसंस्थांनी विक्री सुरु ठेवली आहे. 

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार