Join us  

बाजार खुला होताच 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, सातत्यानं दिसून येतेय तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2023 1:20 PM

शेअर बाजारातील तेजीमध्ये आज अनेक शेअर्सनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.

शेअर बाजारातील तेजीमध्ये आज अनेक शेअर्सनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. अनेक शेअर्समध्ये आज तेजी पाहायला मिळत आहे. अशाच एका एएमसी स्टॉकमध्ये 17 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आज, निप्पॉन लाईफ इंडिया अॅसेट मॅनेजमेंटच्या स्टॉकमध्ये 17.73 टक्क्यांची बंपर रॅली पाहायला मिळत आहे. BSE वर शेअरची इंट्राडे उच्चांकी पातळी 301.25 रुपये आणि नीचांकी पातळी 258.50 रुपये प्रति शेअर होती. आजच्या ट्रेडिंग सत्रात निफ्टीमध्ये 0.65 टक्क्यांची वाढ दिसली, तर दुसरीकडे, सेन्सेक्स 0.71 टक्क्यांनी वाढला होता.

नुकत्याच झालेल्या सेबीच्या बैठकीच्या निकालानंतर एएमसी शेअर्समध्ये वाढ दिसून आली आहे. निप्पॉन लिमिटेडनं प्रति शेअर 7.50 रुपयांचा लाभांश जाहीर केलाय. आर्थिक वर्ष 2022-23 साठी एकूण लाभांश प्रति शेअर 11.50 रुपये आहे. त्याची रेकॉर्ड डेट आज म्हणजेच 30 जून 2023 निश्चित करण्यात आली आहे. लाभांशाची अंतिम तारीख 19 जुलै 2023 पासून सुरू होणार आहे.

निप्पॉन लाइफ इंडिया असेट्स मॅनेजमेंट, म्युच्युअल फंड मॅनेजमेंट, पेन्शन फंड, ऑफशोअर फंड अशा अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. गुंतवणूकदारांना या शेअरनं सातत्यानं बंपर परतावाही दिलाय. याशिवाय कंपनीनं सातत्यानं 87.8 टक्क्यांचा स्ट्राँग डिव्हिडंट पे आऊट रेशो कायम ठेवलाय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक