RK SWAMY IPO Listing Today: आर के स्वामीचे शेअर्स आज, मंगळवारी शेअर बाजारात डिस्काउंटवर लिस्ट झाले. कंपनीचे शेअर्स 252 रुपयांवर लिस्ट झाले, जे 288 रुपयांच्या इश्यू प्राईजपेक्षा 13 टक्क्यांनी कमी आहे. लिस्ट झाल्यानंतर, कंपनीचे शेअर्स इंट्राडे नीचांकी 248 रुपयांवर पोहोचले. आरके स्वामी कंपनीच्या आयपीओची एकूण किंमत 423.56 कोटी रुपये होती.
आरके स्वामी आयपीओ सबस्क्रिप्शन स्टेटस
आरके स्वामी आयपीओच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी, आयपीओ जवळपास 25.78 पट सबस्क्राइब झाला. रिटेल श्रेणीत 33.31 पट सबस्क्रिप्शन मिळालं, तर नॉन-इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टमेंट कोटा 34.24 पट आणि क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा कोटा (QIB) 20.58 पट सबस्क्राईब झाला होता. कंपनीने 423 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी त्यांचे शेअर्स 270-288 रुपये प्रति शेअरच्या दरानं विकले. कंपनीचं एकूण मार्केट कॅप ₹1,450 कोटी रुपये आहे.
काय आहेत इतर तपशील?
हा आयपीओ 173 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स आणि प्रमोटर्स, तसंच गुंतवणूकदारांच्या 87 लाखांच्या इक्विटी शेअर्सची विक्री म्हणजेच ओएफएस, असं स्वरुप होतं. प्रमोटर श्रीनिवासन के स्वामी आणि नरसिह्मन कृष्णास्वामी यांनी ओएफएसद्वारे 17.88 लाख इक्विटी शेअर्स विकले. तर गुंतवणूकदार इवान्स्टन पायनिअर फंड एलपीनं 44.45 लाख इक्विटी शेअर्स आणि प्रेम मार्केटिंग व्हेन्चर्स एलपीनं 6.778 लाख इक्विटी शेअर्स ओएफएसच्या माध्यमातून विकले.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)