Axiscades share price: शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिलाय. तर अनेक शेअर्स असेही आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचं नुकसानही केलंय. दरम्यान, आयटी क्षेत्राशी संबंधित अॅक्सिस्केड्स टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. कंपनीच्या शेअरनं सलग दुसऱ्या दिवशी ५ टक्क्यांचा उच्चांक गाठला आणि किंमत ७७६.८५ रुपये प्रति शेअरपर्यंत पोहोचली. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ८३९.४ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ४२१.०५ रुपये प्रति शेअर आहे. आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी कराराच्या घोषणेनंतर शेअरमध्ये तेजी दिसून आली.
कराराचा तपशील काय आहे?
अॅक्स्केड्स टेक्नॉलॉजीजची उपकंपनी असलेल्या मिस्ट्रल सोल्यूशन्सनं अल्टराशी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केलीये. या सहकार्याअंतर्गत दोन्ही कंपन्या कम्प्युटिंग सोल्यूशन्सचा पाठपुरावा करणार आहेत. स्टॉक एक्स्चेंजफायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मिस्ट्रल सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, (मिस्ट्रल) ही अॅक्सिस्केड्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडची (अॅक्सिसकेड्स) उपकंपनी आहे. ही कंपनी डिफेन्स, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये (ईएसएआय) आघाडीवर आहे. कम्प्युटिंग सोल्यूशन्स पुढे नेण्यासाठी कंपनीची अल्टेरा (एक इंटेल कंपनी) बरोबर धोरणात्मक भागीदारी आहे.
कंपनीबद्दल माहिती
अॅक्सिस ही एक आघाडीची, एंड-टू-एंड टेक, प्रोडक्ट आणि सोल्युशन प्रोव्हायडर आहे जी जगभरातील एरोस्पेस, संरक्षण आणि ईएसएआय डोमेनच्या निर्मितीत मदत करते. याचं मुख्यालय बेंगळुरू येथे आहे. फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क, अमेरिका आणि कॅनडा येथे कंपनीच्या उपकंपन्या आणि कार्यालये आहेत. कंपनीची जगभरात १५ ठिकाणी काम करणारी ३००० हून अधिक प्रोफेशनल्सची टीम आहे. एअरबोर्न सिस्टीम आणि टेलिमेट्री, रडार आणि सोनार सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सोल्युशन्स, C4I2, ड्रोन्स, अँटी-ड्रोन सिस्टीम, टेस्ट सोल्युशन्समध्ये कंपनीची एक्सपर्टीज आहे.
प्रवर्तकांचा हिस्सा किती?
अॅक्सिस्केड्स टेक्नॉलॉजीजच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचं झालं तर ५९.५६ टक्के हिस्सा प्रवर्तकांकडे आहे. तर, पब्लिक शेअरहोल्डिंग ४०.४४ टक्के आहे. प्रवर्तकांमध्ये ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि इंडियन एरो व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांता सल्ला घेणं आवश्यक आहे.)