Join us  

या IPO चे आज अलॉटमेंट, सचिन तेंडुलकरसह 4 दिग्गज खेळाडूंची कंपनीत मोठी गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 9:49 PM

कंपनीची उत्पादने एअरोस्पेस, संरक्षण, ऊर्जा आणि वायू उद्योगांना पुरवली जातात.

IPO: एअरोस्पेस कॉम्पोनन्ट आणि टर्बाइन निर्मिती करणाऱ्या आझाद इंजिनिअरिंगच्या (Azad Engineering IPO) IPO चे वाटप आज होणार आहे. तुम्ही या IPO मध्ये अर्ज केला असेल, तर तुम्हाला शेअर्सचे वाटप झाले आहे की नाही, हे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तपासू शकता. हा IPO त्याच्या उत्कृष्ट ग्रे मार्केट प्रीमियममुळे (GMP), तसेच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर जोडला गेल्याने चर्चेत आहे.

दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आझाद इंजिनिअरिंगमध्ये या वर्षी मार्चमध्ये 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. आयपीओपूर्वी कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस अंतर्गत शेअर्सचे वितरण केले होते. यानुसार सचिन तेंडुलकरकडे सध्या एकूण 4,38,210 शेअर्स आहेत. आपण IPO च्या वरच्या प्राइस बँडवर नजर टाकली तर सचिनकडे सध्या सुमारे 23 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. तर या IPO चा GMP 65% दाखवत आहे. अशा स्थितीत यादीत आल्यानंतर सचिनची कमाई आणखी वाढणार आहे.

सचिनसह या खेळाडुंची गुंतवणूक

या कंपनीतील इतर शीर्ष गुंतवणूकदारांमध्ये स्टार खेळाडू पीव्ही सिंधू, सायना नेहवाल आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचाही समावेश आहे. या तिघांनीही या कंपनीत प्रत्येकी एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीने IPO साठी 499-524 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. या IPO मधील ऑफर अंतर्गत, सुमारे 50% पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, 35% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित 15% गैर-संस्थागत गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.

आझाद इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर 28 डिसेंबर रोजी बाजारात लिस्ट होणार आहे. IPO चा एकूण आकार रु. 740 कोटी असून, त्यापैकी रु. 240 कोटी नवीन इक्विटी इश्यू आहेत, तर रु 500 कोटी ऑफर फॉर सेल (OFS) आहेत. आयपीओमध्ये सचिन तेंडुलकरचे शेअर्स विकले जात नसल्याचे कंपनीच्या प्रवर्तकाने स्पष्ट केले आहे.

शेअर अलॉटमेंट कशी चेक करालStep 1: BSE च्या अधिकृत bseindia.com/investors/appli_check.aspx वेबसाइटवर जा.Step 2: इश्यू टाइप अंतर्गत 'Equity' ला सलेक्ट करा.Step 3: 'Issue Name' म्हणजेच, Azad Engineering Limited चे नाव निवडा, नंतर अॅप्लीकेशन नंबर किंवा PAN नंबर टाका.Step 4:  'I'm not a robot' वर क्लिक करुन सबमिट करा.

Azad Engineering चा व्यवसाय

आझाद इंजिनिअरिंग एरोस्पेस कम्पोनंट आणि टर्बाइन तयार करण्याच्या व्यवसायात आहे. कंपनीची सुरुवात 1983 साली झाली होती. कंपनीची उत्पादने एरोस्पेस, संरक्षण, ऊर्जा, तेल आणि वायू उद्योगांना पुरवली जातात. हैदराबाद आणि तेलंगणामध्ये 4 कारखाने आहेत. कंपनीचे अमेरिका, चीन, युरोप, मध्य पूर्व आणि जपानमध्ये जागतिक ग्राहक आहेत. FY23 मध्ये कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल वार्षिक आधारे 31% वाढून रु. 261 कोटी झाला, तर याच कालावधीत निव्वळ नफा 71% घसरून रु. 8.4 कोटी झाला.

(नोट: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.) 

टॅग्स :सचिन तेंडुलकरशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक