Lokmat Money >शेअर बाजार > बाबा रामदेव यांच्या कंपनीनं दिला बंपर परतावा, शेअरचा नवा विक्रम; आता दोन वस्तूंवर वाढवणार फोकस

बाबा रामदेव यांच्या कंपनीनं दिला बंपर परतावा, शेअरचा नवा विक्रम; आता दोन वस्तूंवर वाढवणार फोकस

कंपनीच्या शेअरचा यापूर्वीचा उच्चांक 1519.65 रुपये एवढा होता. हा शेअर 26 जून 2020 रोजी या पातळीवर होता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 05:01 PM2023-12-06T17:01:39+5:302023-12-06T17:02:36+5:30

कंपनीच्या शेअरचा यापूर्वीचा उच्चांक 1519.65 रुपये एवढा होता. हा शेअर 26 जून 2020 रोजी या पातळीवर होता. 

Baba Ramdev's company patanjali foods shares gave a bumper return now will focus on biscuits and masala category | बाबा रामदेव यांच्या कंपनीनं दिला बंपर परतावा, शेअरचा नवा विक्रम; आता दोन वस्तूंवर वाढवणार फोकस

बाबा रामदेव यांच्या कंपनीनं दिला बंपर परतावा, शेअरचा नवा विक्रम; आता दोन वस्तूंवर वाढवणार फोकस

बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्सच्या शेअरने नवा विक्रम बनवला आहे. पतंजली फूड्सचा शेअर बुधवारी 5 टक्क्यांहून अधिकच्या तेजीसह 1584.95 रुपयांवर पोहोचला आहे. हा पतंजली फुडस्चा नवा उच्चांक आहे. कंपनीच्या शेअरचा यापूर्वीचा उच्चांक 1519.65 रुपये एवढा होता. हा शेअर 26 जून 2020 रोजी या पातळीवर होता. 

फूड सेगमेन्टवर लक्ष केंद्रीत करण्याची तयारी -
पतंजली फूड्सने म्हटल्यानुसार, ते बिस्किट आणि मसाला कॅटेगिरीमध्ये आपले लक्ष केंद्रित करून फूड सेगमेन्टमध्ये आपला वाटा वाढविण्याच्या तयारीत आहेत. पतंजली फूड्सची आपल्या मसाला बिझनेसच्या माध्यमाने 1000 कोटी रुपयांचा सेल मिळविण्याची इच्छा आहे. 

बाबा रामदेव यांनी 5 डिसेंबरला म्हटल्यानुसार, आपला बिस्किट्स आणि एडिबल ऑइल बिझनेस आणखी मजबूत करण्याची कंपनीची इच्छा आहे. यामुळे केवळ ग्रोथलाच वेग येणार नाही, तर मार्जिनही वाढेल. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पतंजली फूड्ससाठी फूड बिझनेसचा वाटा 20 टक्क्यांनी वाढून 28 टक्क्यांवर पोहोचा होता.

6 महिन्यांत शेअरमध्ये 55% हून अधिकची उसळी -
पतंजली फूड्सच्या शेअरमध्ये गेल्या 6 महिन्यांत 55 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे. कंपनीचा शेअर 6 जून 2023 रोजी1031 रुपयांवर होता. तो 6 डिसेंबर 2023 रोजी 1584.95 रुपयांवर पोहोचला. तसेच, गेल्या सहा महिन्यांत पतंजलि फूड्सच्या शेअर्समध्ये 80 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे. हा शेअर 28 मार्च 2023 रोजी 881.75 रुपयांवर होता. तो आता 1584.95 रुपयांवर पोहोचला आहे. पतंजली फूड्सच्या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक 851.70 रुपये एवढा आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

 

Web Title: Baba Ramdev's company patanjali foods shares gave a bumper return now will focus on biscuits and masala category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.