Join us

Bajaj Auto Share Price: शेअर ₹२०००० पर्यंत पोहोचण्याचा होता दावा, पण विक्रमी कमाईनंतरही शेअर जोरदार आपटले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 2:05 PM

Bajaj Auto Shares: बजाज समूहाची ऑटो युनिट बजाज ऑटोची चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ ची दुसरी तिमाही अपेक्षेप्रमाणे राहिली. कंपनीला विक्रमी महसूल मिळाला, तरीही आज बाजार उघडला तेव्हा कंपनीचा शेअर जोरदार आपटला.

Bajaj Auto Shares: बजाज समूहाची ऑटो युनिट बजाज ऑटोची चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ ची दुसरी तिमाही अपेक्षेप्रमाणे राहिली. कंपनीला विक्रमी महसूल मिळाला, तरीही आज बाजार उघडला तेव्हा कंपनीचा शेअर जोरदार आपटला. हळूहळू त्यात ११ टक्क्यांची घसरण झाली आणि आज बजाजचा शेअर निफ्टी ५० चा टॉप लूजर ठरला. दुपारच्या सुमारास शेअर ११.७२ टक्क्यांच्या घसरणीसह १०,२५३ रुपयांवर आला होता.

आपल्या कंपनीचे शेअर २० हजार रुपयांच्या पातळीपर्यंत पोहोचू शकतात, असं बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज यांचं म्हणणं आहे. सध्या ते या पातळीवरून सुमारे ४८ टक्क्यांनी खाली आले आहेत. गेल्या महिन्यात २७ सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीचे शेअर्स १२,७७२.१५ रुपयांच्या एका वर्षाच्या उच्चांकी पातळीवर होते आणि या उच्चांकी पातळीवरून सध्या ते १९ टक्क्यांनी घसरले आहे. गेल्या वर्षी १८ ऑक्टोबर २०२३ रोजी कंपनीचा शेअर ५,१२५.२५ रुपयांच्या एका वर्षातील नीचांकी पातळीवर होता.

Bajaj Auto मध्ये घसरणीचं कारण काय?

ब्रोकरेज फर्म सिटीनं या शेअरला ७८०० रुपयांच्या टार्गेट प्राईजवर सेल रेटिंग दिलं आहे. तर दुसरीकडे जेफरीजनं कंपनीच्या शेअरला १३४०० रुपयांच्या टार्गेट प्राईजवर खरेदीचं रेटिंग दिलंय. कंपनीचा इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये हिस्सा वाढत आहे. तर दुसरीकडे सीएनजी बाईकचीही विक्री वाढतेय आणि ब्राझीलमध्ये कंपनी आपल्या क्षमेतचा विस्तार करत असल्याचं ब्रोकरेजचं म्हणणं आहे.

सीएलएसएनं कंपनीच्या शेअरला ९४९३ रुपयाच्या टार्गेट प्राईजवर अंडरपरफॉर्म रेटिंग दिलंय. गोल्डमॅन सॅक्सनं कंपनीच्या शेअरला १२ हजार रुपयांच्या टार्गेट प्राईजवर न्यूट्रल रेटिंग दिलंय. शेअरवर कव्हरेज करणाऱ्या ४५ एक्सपर्ट्सपैकी २० नं खरेदी, ९ जणांनी होल्ड तर १६ जणांनी सेल रेटिंग दिलंय. बजाजचे प्रमुख राजीव बजाज यांनी यापूर्वी सीएनबीसी टीव्ही १८ ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान कंपनीचे शेअर्स २० हजारांपर्यंत जाऊ शकतात असा दावा केला होता.

टॅग्स :बजाज ऑटोमोबाइलशेअर बाजार