Join us  

₹ ४.६१ वरुन ५८९२ वर पोहोचला हा शेअर, १ लाखाचे झाले १०.२४ कोटी; एक्सपर्ट म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 4:45 PM

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चढ उतार दिसून येत आहेत. पण या शेअरबाबत एक्सपर्ट्स मात्र बुलिश आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चढ उतार दिसून येत आहेत. दुसरीकडे वर्षात आतापर्यंत बजाज फायनान्सचे शेअर्सनं गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या काही दिवसांत या शेअरमध्ये 10 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. हा शेअर त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी 8045 रुपयांवरून ५९०० रुपयांवर घसरला आहे. त्या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 5220 रुपये आहे. बजाज फायनान्सबाबत एक्सपर्ट्स मात्र बुलिश आहेत.

रिस्क मीटरवर 29 टक्के बॅलन्स्ड रिस्क असलेल्या या स्टॉकने गेल्या एका वर्षात 23 टक्क्यांहून अधिक निगेटिव्ह रिटर्न दिला आहे. त्याच वेळी, गेल्या पाच वर्षांत 233 टक्क्यांहून अधिक मल्टीबॅगर रिटर्न दिले आहे. कंपनीचे मार्केट कॅप 3.56 लाख कोटी रुपये आहे.

23 ऑगस्ट 2002 रोजी, बजाज फायनान्सचे शेअर्स केवळ 4.61 रुपये किमतीवर उपलब्ध होते. आता त्यात 5900 च्या आसपास व्यवहार होत आहे. या दरम्यान त्याने 102384 टक्क्यांची झेप घेतली आहे. म्हणजेच 23 ऑगस्ट 2022 रोजी जर एखाद्याने या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील आणि ते आतापर्यंत कायम ठेवले असतील तर त्याच्या एक लाख रुपयांचे मूल्य 10.24 कोटींपेक्षा जास्त झाले असेल.

काय म्हणतात एक्सपर्ट्स?"बजाज फायनान्स दैनंदिन चार्टवर 6,106 रुपयांच्या मजबूत रेझिस्टंससह ओव्हरसोल्ड दिसत आहे. गुंतवणूकदार केवळ 6,106 रुपयांच्या वरच्या बंदवर 6,400-6,818 रुपयांच्या टार्गेटसाठी खरेदी करू शकतात," असे Tips2trades च्या पवित्रा शेट्टी यांनी सांगितले. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि तांत्रिक संशोधन विश्लेषक जिगर एस पटेल यांनी 5,600-5,700 रुपयांच्या जवळ बजाज फायनान्सवर खरेदीचा सल्ला दिला आहे. 5,300 च्या स्टॉप लॉससह 6,300 रुपयांचे टार्गेट ठेवण्यात आले होते.

जर इतर विश्लेषकांबद्दल सांगायचं झालं तर 29 विश्लेषकांपैकी 12 विश्लेषकांनी स्ट्राँग बायचा सल्ला दिला आहे. त्याच वेळी, पाच जणांनीदेखील त्यावर खरेदीचा सल्ला दिलाय. तर, 7 जणांनी विक्रीचा सल्ला दिला आहे आणि 5 जणांनी होल्ड करण्याचा सल्ला दिलाय.(टीप - या लेखात केवळ शेअरच्या कामगिरीबद्दल माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक