Join us  

Bajaj Housing Finance Shares: धमाकेदार लिस्टिंगनंतर अपर सर्किट, प्रॉफिट बूक करावं की होल्ड? एक्सपर्ट म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 2:36 PM

Bajaj Housing Finance Shares: बजाज समूहाची हाऊसिंग फायनान्स कंपनी बजाज हाऊसिंग फायनान्सचे शेअर्स आज ११४ टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर लिस्ट झाले. त्यानंतर शेअर १० टक्क्यांच्या अपर सर्किटवर गेला.

Bajaj Housing Finance Shares: बजाज समूहाची हाऊसिंग फायनान्स कंपनी बजाज हाऊसिंग फायनान्सचे शेअर्स आज ११४ टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर लिस्ट झाले. धमाकेदार लिस्टिंगनंतर शेअर्सची खरेदी आणखी वाढली आणि त्यानंतर शेअर १० टक्क्यांच्या अपर सर्किटवर गेला. कंपनीच्या आयपीओलाही ३.१५ लाख कोटी रुपयांची विक्रमी बोली लागली आणि आता शेअर बाजारात त्याच्या दमदार एन्ट्रीमुळे गुंतवणूकदार सुखावले आहेत. सध्या शेअरला बीएसईवर १६४.९९ रुपयांचं अपर सर्किटवर लागलंय. गुंतवणूकदारांना हे शेअर्स ७० रुपये दरानं देण्यात आले. ६,५६० कोटी रुपयांच्या आयपीओवर एकूण ६७ पट बोली लागली होती.

प्रॉफिट बुकिंग करावं की होल्ड करावा?

मनी कंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे प्रमुख (इक्विटी रिसर्च-फंडामेंटल) नरेंद्र सोळंकी गुंतवणूकदारांना लाँग टर्मसाठी ही गुंतवणूक ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कंपनी विद्यमान ग्राहकांशी असलेलं आपलं नातं अधिक दृढ करून तसेच नवीन ग्राहक जोडून आणि नवीन क्षेत्रात प्रवेश करून संपूर्ण बाजारपेठेत आपलं वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या प्रीमियम मूल्यांकनाबद्दल घाबरून जाण्याची गरज नाही कारण त्याला वेगानं वाढणाऱ्या एयूएम वाढीचा आधार मिळत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

मात्र, एयूएम कॅपिटलचे संशोधन प्रमुख राजेश अग्रवाल यांनी गुंतवणूकदारांना काही प्रॉफिट बुकिंग करण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे एसएमटीचे सहसंस्थापक आणि सेबीचे नोंदणीकृत रिसर्च अॅनालिस्ट व्हीएलए अंबाला यांनीही गुंतवणूकदारांना नफ्यातील निम्मा हिस्सा काढून उर्वरित दीर्घ मुदतीसाठी ठेवण्याचा सल्ला दिलाय.

क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा कोटा २२२ पट, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा ४३.९८ पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा ७.४१ पट सबस्क्राइब झाला होता. कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेला हिस्सा २.१३ पट सबस्क्राइब झाला. अनेक वर्षांनंतर बजाज समूहाची एक कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली. लिस्टिंगच्या दिवशी कंपनी दमदार सुरुवात करू शकते आणि गुंतवणूकदारही मोठा नफा कमावू शकतात, अशी अपेक्षा यापूर्वी अनेकांना होती.

३ लाख कोटींपेक्षा अधिकचं सबस्क्रिप्शन

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. ऑफरच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी बुधवारी ६,५६० कोटी रुपयांच्या इश्यूला ६३.६० पट सब्सक्राइब करण्यात आलं. यासाठी तीन लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची बोली लागली. एनएसईच्या आकडेवारीनुसार, आयपीओमध्ये ७२,७५,७५,७५६ शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत एकूण ४६,२७,४८,४३,८३२ शेअर्ससाठी बोली लावण्यात आली होती.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक