Lokmat Money >शेअर बाजार > Bajaj Housing IPO Listing: बजाज हाऊसिंग फायनान्सची धमाकेदार एन्ट्री, गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; ११४% वाढला शेअरचा भाव 

Bajaj Housing IPO Listing: बजाज हाऊसिंग फायनान्सची धमाकेदार एन्ट्री, गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; ११४% वाढला शेअरचा भाव 

Bajaj Housing Finance IPO Listing: आज या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आयपीओपैकी एक असलेल्या बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ लिस्ट झाला आहे. या आयपीओकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 10:23 AM2024-09-16T10:23:15+5:302024-09-16T10:24:12+5:30

Bajaj Housing Finance IPO Listing: आज या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आयपीओपैकी एक असलेल्या बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ लिस्ट झाला आहे. या आयपीओकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

Bajaj Housing IPO Listing ipo makes bang up entry doubles investor s money Share price increased by 114 percent | Bajaj Housing IPO Listing: बजाज हाऊसिंग फायनान्सची धमाकेदार एन्ट्री, गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; ११४% वाढला शेअरचा भाव 

Bajaj Housing IPO Listing: बजाज हाऊसिंग फायनान्सची धमाकेदार एन्ट्री, गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; ११४% वाढला शेअरचा भाव 

Bajaj Housing Finance IPO Listing: शेअर बाजारात दिवसभराच्या व्यवहाराव्यतिरिक्त १६ सप्टेंबर हा दिवस एका वेगळ्याच कारणामुळे खास ठरला. आज या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आयपीओपैकी एक असलेल्या बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ (Bajaj Housing Finance IPO) लिस्ट झाला आहे. या आयपीओकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. 

बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओसाठी प्रति शेअर ६६ ते ७० रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. पण त्या तुलनेत स्टॉक शेअर बाजारात ११४% प्रिमियमवर म्हणजेच १५० रुपयांच्या किमतीवर लिस्ट झाला. म्हणजे ज्यांनी आयपीओमध्ये पैसे गुंतवले होते आणि ज्यांना अलॉटमेंट मिळाले होते, त्यांचे पैसे दुप्पट झाले आहेत. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा ६,५६० कोटी रुपयांचा आयपीओ ६३.६० पट सब्सक्राइब झाला होता.

क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा कोटा २२२ पट, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा ४३.९८ पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा ७.४१ पट सबस्क्राइब झाला होता. कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेला हिस्सा २.१३ पट सबस्क्राइब झाला. अनेक वर्षांनंतर बजाज समूहाची एक कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली. लिस्टिंगच्या दिवशी कंपनी दमदार सुरुवात करू शकते आणि गुंतवणूकदारही मोठा नफा कमावू शकतात, अशी अपेक्षा यापूर्वी अनेकांना होती.

३ लाख कोटींपेक्षा अधिकचं सबस्क्रिप्शन

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. ऑफरच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी बुधवारी ६,५६० कोटी रुपयांच्या इश्यूला ६३.६० पट सब्सक्राइब करण्यात आलं. यासाठी तीन लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची बोली लागली. एनएसईच्या आकडेवारीनुसार, आयपीओमध्ये ७२,७५,७५,७५६ शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत एकूण ४६,२७,४८,४३,८३२ शेअर्ससाठी बोली लावण्यात आली होती.

काही वेळातच झालेला पूर्ण सबस्क्राइब

बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ (Bajaj Housing Finance IPO) सोमवारी उघडल्यानंतर काही तासांतच पूर्णपणे सबस्क्राइब झाला. इश्यू उघडण्यापूर्वी कंपनीने शुक्रवारी प्रमुख (अँकर) गुंतवणूकदारांकडून १,७५८ कोटी रुपये जमा केले होते. बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओसाठी प्राईज बँड (Bajaj Housing Finance IPO Price Band) ६६ ते ७० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. या आयपीओमध्ये ३,५६० कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स आणि मूळ कंपनी बजाज फायनान्सकडून ३,००० कोटी रुपयांच्या विद्यमान शेअर्सच्या ऑफर फॉर सेल (ओएफएस) यांचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नियमांचे पालन करण्यासाठी ही शेअर विक्री केली जात आहे. यानुसार आघाडीच्या नॉन बँकिंग फायान्शिअल कंपन्यांना सप्टेंबर २०२५ पर्यंत शेअर बाजारात लिस्ट होणं आवश्यक आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Bajaj Housing IPO Listing ipo makes bang up entry doubles investor s money Share price increased by 114 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.