Bajaj IPO : 98 वर्षे जुन्या बजाज ग्रुपच्या बजाज हाउसिंग फायनान्सचा IPO येत्या 9 सप्टेंबरला येणार आहे. याद्वारे एकूण 6,560 कोटी रुपये जमवण्याची कंपनीची योजना आहे. हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या RHP नुसार, IPO 11 सप्टेंबर रोजी बंद होईल. एंकर म्हणजेच मोठे गुंतवणूकदार इश्यू सुरू होण्याच्या एक दिवस आधी, 6 सप्टेंबरला बोली लावू शकतील.
आरबीआयच्या नवीन नियमामुळे आणला IPO
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या नियमांचे पालन करण्यासाठी शेअर विक्री केली जात आहे. या अंतर्गत, उच्च स्तरावरील नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांना (NBFCs) सप्टेंबर 2025 पर्यंत स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणे आवश्यक आहे. आयपीओमधून मिळणारे पैसे कंपनीचा भांडवल आधार वाढवण्यासाठी आणि भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी वापरले तातील. कंपनीबद्दल सांगायचे झाले तर, बजाज हाऊसिंग फायनान्स ही एक गृहनिर्माण वित्त कंपनी असून, सप्टेंबर 2015 पासून नॅशनल हाऊसिंग बँकेत नोंदणीकृत आहे. भारतातील RBI द्वारे ही उच्च श्रेणीतील NBFC म्हणून ओळखली जाते.
गेल्या वर्षी किती नफा झाला?
2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीला 1,731 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. 2022-23 या आर्थिक वर्षातील 1,258 कोटी रुपयांपेक्षा हे प्रमाण 38 टक्के अधिक आहे. आधार हाऊसिंग फायनान्स आणि इंडिया शेल्टर फायनान्स, या दोन गृहनिर्माण वित्त कंपन्या आहेत, ज्या अलिकडच्या काही महिन्यांत स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट झाल्या आहेत. बजाज हाऊसिंग फायनान्सने जूनमध्ये 7,000 कोटी रुपयांच्या IPO साठी सेबीकडे प्रॉस्पेक्टस सादर केले होते. बाजार नियामकाने या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीच्या पहिल्या सार्वजनिक ऑफरला मान्यता दिली.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)