Join us

बजाज IPO घेण्याची संधी हुकली? 'या' बँकेचा शेअर पुढील 2-3 दिवसात होणार रॉकेट; ब्रोकर म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 2:07 PM

Bank Stock to Buy : मोतीलाल ओसवाल यांनी खाजगी बँक शेअर आयसीआयसीआय बँकेची टेक्निकल निवड केली आहे. ब्रोकरेजने 2-3 दिवसांच्या दृष्टीकोनातून बँक शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Bank Stock to Buy : भारतीय शेअर बाजारात सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्सने ऐतिहासिक उच्चांकी गाठली. त्यानंतर बजाज हाउसिंग फायनान्सच्या आपीओने बाजारात धुमाकूळ घातला. शेअर लिस्टींग झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी बजाजचा शेअर अप्पर सर्किट लागला आहे. मंगळवारी (१७ सप्टेंबर) शेअर बाजारांची सुरुवात मंदावली होती. बाजार ग्रीन सिग्नलने उघडला पण अल्पावधीतच त्याला प्रॉफिट बुकींगचा फटका बसला. अशात बजाजच्या शेअर्स घेण्याची संधी हुकली असे तुम्हाला वाटत असेल तर आगामी काळात काही बँकांच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ होण्याची शक्यता ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी वर्तवली आहे.

मंगळवारची भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सपाट होती. बाजार ग्रीनमध्ये उघडला. पण, नंतर रेडमध्ये गेला. सेन्सेक्स ८३,००० च्या खाली गेला होता, तर निफ्टी देखील २५,४०० च्या खाली होता. सुरवातीला सेन्सेक्स ९६ अंकांनी वाढून ८३,०८४ वर पोहोचला. निफ्टी ३३ अंकांनी वाढून २५,४१६ वर तर बँक निफ्टी ९६ अंकांनी वाढून ५२,२४९ वर उघडला.

ICICI बँकेचा शेअर्स वाढणार? ब्रोकरेज हाउस मोतीलाल ओसवाल यांनी आयसीआयसीआय बँकेची टेक्निकल निवड केली आहे. पुढील २-३ दिवस स्टॉकमध्ये पोझिशनल खरेदीचा सल्ला दिला आहे. टार्गेट प्राइज १३११ रुपये असून १७ सप्टेंबर २०२४ रोजी हा शेअर १२६२ रुपयांवर बंद झाला. अशाप्रकारे या शेअरमध्ये सुमारे ४-५ टक्क्यांची वाढ होऊ शकते.

ICICI बँक शेअर्स 3 महिन्यांत १५% वाढलेमंगळवारी मंदीच्या वातावरणात ICICI बँकेची सुरुवात चांगली झाली. मात्र, किंचित वाढ होऊन शेअर्सने ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. गेल्या एका महिन्यात स्टॉक ७ टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, स्टॉकने ६ महिन्यांत १८ टक्के आणि ३ महिन्यांत सुमारे १५ टक्के परतावा दिला आहे. शेअरचा 1 वर्षाचा परतावा २८ टक्के आहे. बीएसईवरील शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १,२६८.७० आहे तर ८९८.८५ लोवर आहे. कंपनीचे मार्केट कॅप ८.९२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अशात चांगला नफा कमावण्याची संधी पुढील दोनतीन दिवसांत निर्माण होऊ शकते.

(Disclaimer : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक