Lokmat Money >शेअर बाजार > मोठ्या डीलच्या तयारीत Bata, दिग्गज Adidas सोबत सुरूये चर्चा; शेअर्समध्ये तुफान तेजी

मोठ्या डीलच्या तयारीत Bata, दिग्गज Adidas सोबत सुरूये चर्चा; शेअर्समध्ये तुफान तेजी

फुटवेअर उत्पादक कंपनी बाटा इंडिया आणि स्पोर्ट्सवेअर उत्पादक कंपनी आदिदास यांच्यात धोरणात्मक भागीदारीसाठी चर्चा सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 03:22 PM2023-08-17T15:22:43+5:302023-08-17T15:23:56+5:30

फुटवेअर उत्पादक कंपनी बाटा इंडिया आणि स्पोर्ट्सवेअर उत्पादक कंपनी आदिदास यांच्यात धोरणात्मक भागीदारीसाठी चर्चा सुरू आहे.

Bata in talks with giant Adidas in preparation for big deal Stocks boom investors huge profit | मोठ्या डीलच्या तयारीत Bata, दिग्गज Adidas सोबत सुरूये चर्चा; शेअर्समध्ये तुफान तेजी

मोठ्या डीलच्या तयारीत Bata, दिग्गज Adidas सोबत सुरूये चर्चा; शेअर्समध्ये तुफान तेजी

फुटवेअर उत्पादक कंपनी बाटा इंडिया (Bata) आणि स्पोर्ट्सवेअर उत्पादक कंपनी आदिदास (Adidas) यांच्यात धोरणात्मक भागीदारीसाठी चर्चा सुरू आहे. दरम्यान, कंपन्यांमध्ये चर्चा पुढच्या स्तरावर गेली असून लवकरच निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या बातमीदरम्यान, बाटा इंडियाचा शेअर गुरुवारी 2 टक्क्यांनी वाढला आणि त्याची किंमत 1688 रुपयांवर पोहोचली. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 22 हजार कोटी रुपये आहे.

दरम्यान, ही बातमी अशा वेळी समोर आली आहे जेव्हा बाटा इंडियानं स्पोर्ट्स वेअरसाठी चाचण्या सुरू केल्या आहेत. अलीकडेच, बाटा इंडियाचे अध्यक्ष अश्विनी विंडलास यांनी बाजाराचा दृष्टीकोन लक्षात घेता कंपनीच्या भविष्यातील वाढीबद्दल  आशावादी असल्याचं म्हटलं. तसंच कंपनी स्ट्रॅटजीवर लक्ष केंद्रित करत असल्याचेही ते म्हणाले.

तिमाहीचे निकाल
बाटा इंडिया लिमिटेडनं आर्थिक वर्ष 2024 च्या जून तिमाहीत 106.8 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. गेल्या वर्षीच्या 119.3 कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण 10.3 टक्क्यांनी कमी आहे. कंपनीचा महसूल 958.1 कोटी रुपये झाला आहे. जो मागील वर्षीच्या तिमाहीत 943 कोटी रुपयांच्या तुलनेत 1.6 टक्क्यांनी वाढला आहे. बाटा इंडियाचा आर्थिक वर्ष 2023 मध्ये नफा मागील वर्षातील 100 कोटी रुपयांवरून 319 कोटी रुपये इतका वाढला आहे. वर्षादरम्यान कंपनीचा महसूल 3,451.5 कोटी रुपये होता.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Bata in talks with giant Adidas in preparation for big deal Stocks boom investors huge profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.