आपण शेअर बाजारात एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल, तर त्यापासून मिळणाऱ्या परताव्यासाठी काही काळ वाट बघणे आवश्यक आहे. आज आम्ही आपल्याला अशा एका कंपनीसंदर्भात माहिती देत आहोत. जिने अलिकडच्याच काही वर्षांत छप्परफाड परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीचे नाव आहे बीसीएल इंडस्ट्रीज (BCL Industries). या कंपनीच्या शेअर्सना आज 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले आहे.
असा आहे शेअर्सचा इतिहास -
गेल्या एका महिन्यासंदर्भात बोलायचे झाल्यास, कंपनीच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. तसेच, 6 महिन्यांपूर्वी, ज्यांनी BCL Industries वर विश्वास दाखवत गुंतवणूक केली, त्यांची गुंतवणूक व्हॅल्यू 2 टक्क्यांनी घसरली असेल. मात्र, गेल्या एका वर्षात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 8 टक्क्यांचा परतावा दिला आहे. मार्च 2020 मध्ये या कंपनीच्या एका शेअरची किंमत 31 रुपये होती. जी आता 371 रुपयांवर पोहोचली आहे. अर्थात या 3 वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 1100 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.
1 लाखाच्या गुंतवणूकीवर 12 लाख रुपयांचा परतावा -
ज्या गुंतवणूकदारांनी मार्च 2020 मध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असेल, त्यांचे नशीब आता पालटले असेल. ज्या गुंतवणूकदारांनी 3 वर्षांपूर्वी याकंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, त्या गुंतवणूकदारांच्या परताव्याची रक्कम आता वाढून 12 लाख रुपयांवर पोहोचली असेल. या मल्टीबॅगर स्टॉकचा 52 आठवड्यांती उच्चांक एनएसईवर 530 रुपये तर निचांक 278.65 रुपये एवढा आहे. तसेच, कंपनीचे मार्केट कॅप 896 कोटी रुपये एवढे आहे.