Join us

Share Market Crash : शेअर बाजारात भूकंप, Sensex १३०० अंकांपेक्षा अधिकनं आपटला, निफ्टीही ४३० अंकांनी घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 11:34 AM

कामकाजादरम्यान शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १३७४ अंकांच्या घसरणीसह ७८३४९ अंकांवर आला. तर दुसरीकडे निफ्टीही जोरदार आपटला.

Share Market Live Updates 4 November: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली होती. परंतु सोमवारी सुट्टीनंतर शेअर बाजार उघडताच त्यात मोठी घसरण दिसून आली. कामकाजादरम्यान शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १३७४ अंकांच्या घसरणीसह ७८३४९ अंकांवर आला. तर दुसरीकडे निफ्टीही जोरदार आपटला आणि त्यात ४४५ अंकांची घसरण होऊन तो २३८५९ वर आला.सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचे झाले तर बँकिंग, फायनान्स आणि आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. बाजारात अशी घसरण होण्यामागे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आणि फेड रिझर्व्हची बैठक कारणीभूत ठरली आहे.

सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचे झाले तर बँकिंग, फायनान्स आणि आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. बाजारात अशी घसरण होण्यामागे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आणि फेड रिझर्व्हची बैठक कारणीभूत ठरल्याचं म्हटलं जातंय.

१५ मिनिटांतच ५.५ लाख कोटी स्वाहा

कामाकाजाच्या सुरुवातीच्या १५ मिनिटांतच सेन्सेक्समधील लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप ५.५६ लाख कोटी रुपयांनी घटलं, त्यानंतर ते ४४२.५४ कोटी रुपये झाले. रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि सन फार्मा यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. तर दुसरीकडे एल अँड टी, अॅक्सिस बँक, टीसीएस आणि टाटा मोटर्स यांनीही निर्देशांकात घसरण केली.

निवडणुकीपूर्वी भीती

अमेरिकेत ५ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चुरशीच्या लढतीमुळे संभाव्य आर्थिक परिणामांबाबत गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

फेडची बैठक

दरम्यान, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची धोरणात्मक बैठक ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यावेळीही व्याजदर कपात होऊ शकते, ज्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा भारतात ओघ वाढू शकतो. मात्र, जोपर्यंत फेडच्या भूमिकेबाबत स्पष्टता येत नाही, तोपर्यंत गुंतवणूकदार सावध राहण्याची शक्यता आहे. हेच आज बाजारातील घसरणीचं कारण असल्याचंही म्हटलं जातंय.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक