Lokmat Money >शेअर बाजार > Nifty50 मधून 'हे' शेअर्स जाणार बाहेर, 'यांची' होणार एन्ट्री; पाहा संपूर्ण डिटेल्स

Nifty50 मधून 'हे' शेअर्स जाणार बाहेर, 'यांची' होणार एन्ट्री; पाहा संपूर्ण डिटेल्स

देशातील ५० मोठ्या कंपन्यांच्या इंडेक्स निफ्टी ५० मध्ये बदल करण्यात आला आहे. पाहा कोणते शेअर्स गेले बाहेर आणि कोणत्या शेअर्सची झाली एन्ट्री.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 02:02 PM2024-08-24T14:02:10+5:302024-08-24T14:04:34+5:30

देशातील ५० मोठ्या कंपन्यांच्या इंडेक्स निफ्टी ५० मध्ये बदल करण्यात आला आहे. पाहा कोणते शेअर्स गेले बाहेर आणि कोणत्या शेअर्सची झाली एन्ट्री.

BEL divis labs shares will enter in Nifty50 bel trent will exit See full details stock market investment | Nifty50 मधून 'हे' शेअर्स जाणार बाहेर, 'यांची' होणार एन्ट्री; पाहा संपूर्ण डिटेल्स

Nifty50 मधून 'हे' शेअर्स जाणार बाहेर, 'यांची' होणार एन्ट्री; पाहा संपूर्ण डिटेल्स

देशातील ५० मोठ्या कंपन्यांच्या इंडेक्स निफ्टी ५० मध्ये बदल करण्यात आला आहे. एनएसईनं दिलेल्या माहितीनुसार भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) आणि ट्रेंट ३- सप्टेंबरपासून डिविज लॅब्स आणि एलटीआय माईंट्री यांची जागा घेतील. आता डिविज लॅब्स आणि एलटीआय माईंट्रीला निफ्टी ५० मधून नेक्स्ट ५० मध्ये सामील केलं जाईल. BEL आणि ट्रेंटला निफ्टी नेक्स्ट ५० मधून निफ्टी ५० मध्ये सामील केलं जाईल.

यासोबतच BHEL, JSW एनर्जी, मायक्रोटेक, एनएचपीसी आणि युनिअन बँकेलाही निफ्टी ५० मध्ये सामील केलं जाईल. तर दुसरीकडे बर्जर पेंट्स, कोलगेट, मॅरिको, एसबीआय कार्ड्स आणि एसआयएफला निफ्टी नेक्स्ट ५० मधून बाहेर ठेवलं जाईल.

निफ्टी बँक आणि निफ्टी ५०० मध्ये बदल

त्याचप्रमाणे निफ्टी बँक निर्देशांकातील बदलानुसार सरकारी बँक कॅनरा बँकेची एन्ट्री होणार आहे, तर बंधन बँकेला निर्देशांकातून बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे. निफ्टी ५०० निर्देशांकातून व्होडाफोन आयडियासह २६ शेअर्स वगळले जात आहेत. यामध्ये वैभव ग्लोबल, एथर इंडस्ट्रीज, ऑल कार्गो लॉजिस्टिक्स, अनुपम रसायन, बोरोसिल रिन्युएबल्स, सीएसबी बँक, डीसीएम श्रीराम, जेके पेपर, केआरबीएल, एमटीएआर टेक आणि रेस्टॉरंट ब्रँड्स इंडिया यांचा समावेश आहे.

वर्षातून दोनदा होतो बदल 

एनएसई निफ्टीचे विविध निर्देशांक दरवर्षी दोनदा बदलले जातात. यंदाचा हा दुसरा सहामाही बदल आहे. निफ्टीच्या विविध निर्देशांकातील बदलाचा आधार सरासरी फ्री फ्लोट मार्केट कॅप असतो.

Web Title: BEL divis labs shares will enter in Nifty50 bel trent will exit See full details stock market investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.