Join us  

40 रुपयांचा शेअर 2 हजारांवर, टायर बनवणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 6:43 PM

Best Multibagger Stock: या स्टॉकने सूमारे पाच हजार टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

Ceat Share Performance: शेअर बाजारातगुंतवणूक कधी धोक्याची तर कधी खूप फायद्याची ठरते. कधी-कधी मोठ्या कंपनीच्या स्टॉकमुळे नुकसान होऊ शकते, तर कधी-कधी एखादा मल्टिबॅगर स्टॉक तुम्हाला मोठे रिटर्न्स देऊन जातो. अशाच एका मल्टिबॅगर स्टॉकने दीर्घकालीन गुंतवणुकीवर मोठा परतावा दिला आहे. या स्टॉकमध्ये पैसे लावणारे लखपती-करोडपती झाले आहेत.

टायर बनवणारी आघाडीची भारतीय मल्टिनॅशनल कंपनी CEAT लिमिटेड या स्टॉकने दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. CEAT ने केवळ दीर्घकालीन वाढच दाखवली नाही तर यात गेल्या वर्षभरातही जोरदार वाढही झाली आहे. या वर्षी स्टॉक 120 टक्क्यांहून अधिक वाढला. 

10 हजार रुपये 5.13 लाख झाले2023 मध्ये CEAT स्टॉक जवळपास 28 टक्क्यांनी वाढला आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनाही याचा मोठा फायदा झाला. 20 वर्षांपूर्वी (4 जुलै 2003) शेअरचा भाव 39.78 रुपयांवर होता, जो (4 जुलै 2023) पर्यंत 2042 रुपयांवर आला आहे. याचाच अर्थ 20 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये एखाद्याने 10 हजार रुपये गुंतवले असतेल, तर त्याला आज जवळपास 5.13 लाख रुपये मिळतील. म्हणजेच, या स्टॉकने आतापर्यंत पाच हजार टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

स्टॉक अजून वाढणार?CAT च्या शेअरमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा दिग्गज गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत. टू-व्हीलर सेगमेंटमध्ये ही कंपनी 28 टक्के शेअरसह बाजारात आघाडीवर आहे. प्रवासी वाहनांमध्ये 15 टक्के आणि व्यावसायिक वाहनांमध्ये 7 टक्के वाटा आहे. हा अनुक्रमे 18-19 टक्के आणि 11-12 टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. स्टॉकमध्ये सुमारे 15 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक