Join us  

या कंपनीच्या शेअरने दिले बंपर रिटर्न्स; 40-45 हजाराचे झाले कोट्यवधी...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 8:54 PM

या स्मॉल कॅप कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले.

Top Multibagger Stock: शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या लहान कंपन्या गुंतवणुकीसाठी धोकादायक मानल्या जातात, पण यातील अनेक काही कंपन्या गुंतवणुकदारांना जबरदस्त रिटर्न्स देतात. स्टाइलम इंडस्ट्रीज या कंपनीची गणना शेअर बाजारातील सर्वोत्तम मल्टीबॅगर स्टॉकमध्ये केली जाते. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे.

ही कंपनी स्मॉल कॅप श्रेणीत येते. कंपनीचे बाजार भांडवल सध्या 3,230 कोटी रुपये आहे, परंतु कंपनीचे शेअर्स स्वस्त नाहीत. सध्या स्टाइलम इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत 1,916 रुपये आहे. शुक्रवारी शेअर्स किमतीत 1.62 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. गेल्या एका महिन्यात त्याची किंमत 22 टक्क्यांनी वाढली आहे.

गेल्या 6 महिन्यांत हा शेअर सुमारे 85 टक्क्यांनी आणि या वर्षाच्या सुरुवातीपासून 70 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. कंपनीचे शेअर्स आता महाग आहेत, पण एकेकाळी ते 10 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होते. सुमारे 11 वर्षांपूर्वी स्टाइलम इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत फक्त 8.13 रुपये होती.

याचा अर्थ असा की स्टाइलम इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी गेल्या 11 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 235 पेक्षा जास्त परतावा दिला आहे. सोप्या शब्दात, या शेअरमध्ये 11 वर्षांपूर्वी गुंतवलेले 1 लाख रुपये आज 2.35 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी 11 वर्षांपूर्वी स्टाइलम इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 40-45 हजार रुपये गुंतवले होते, ते आता कोट्यधीश झाले आहेत.

डिस्क्लेमर: आम्ही तुम्हाला कंपनीच्या शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देत आहोत, कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

 

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक