Stock Market: शेअर बाजारात अनेकदा चढ-उतार पाहायला मिळतात. पण, कधी अन् कोणता शेअर गुंतवणुकदारांची चांदी करेल, हे सांगता येत नाही. असाच कारनामा वेलेंसिया न्यूट्रिशन (Valencia Nutrition) च्या शेअरने केला आहे. या कंपनीच्या स्टॉकने फक्त 10 दिवसांमध्ये गुंतवणुकदारांचे पैसे डबल केले. आजही कंपनीचया शेअरमध्ये वाढ नोंदवली गेली आहे.
शेअरची किंमत किती वाढली
दैनंदिन आजारांना रोखण्यासाठी Multi-Nutrient Beverages च्या रिसर्च, डेव्हलपिंग आणि मार्केटिंगवर आधारित असलेल्या या कंपनीने गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे डबल केले आहेत. बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, वेलेंसिया न्यूट्रिशनचे शेअर, 5 सप्टेंबर 2022 ला 10.95 रुपयांवर होते. पण, फक्त 10 दिवसांत या शेअरची व्हॅल्यू 21.25 रुपये झाली. म्हणजेच, या स्टॉकने गेल्या 10 दिवसांमध्ये गुंतवणुकदारांचे पैसे डबल केले.
एक लाखाचे झाले 2 लाख
वेलेंसिया न्यूट्रिशनचा शेअर (Valencia Nutrition share) 19.32 रुपयांवर बंद झाला होता. पण, आज आतापर्यंच्या सर्वोच्च पातळीवर आहे. गुंतवणुकदारांना या शेअरने मोठी कमाई करुन दिली. एखाद्या व्यक्तीने 10 दिवसांपूर्वी कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याला 1.94 लाख रुपये मिळाले अते.
कंपनीचे मार्केट कॅप किती
वेलेंसिया न्यूट्रिशन कंपनी 'बाउंस सुपरड्रिंक्स' आणि 'बाउंस सुपरवॉटर वीटामी' बनवते. याच्या शेअर्समध्ये झालेल्या उसळीमुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर कंपनीचा मार्केट कॅप (Market Cap) वाढून 11.87 कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 91 सार्वजनिक शेयरधारकांकडे (Shareholders) कंपनीत 36.12 टक्के किंवा 20.17 लाख शेयर होते.