Lokmat Money >शेअर बाजार > ४२ व्यांदा डिविडंड देणार 'ही' सरकारी कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित; ३ वेळा दिलेत बोनस शेअर्स

४२ व्यांदा डिविडंड देणार 'ही' सरकारी कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित; ३ वेळा दिलेत बोनस शेअर्स

गुरुवारी कंपनीच्या एका शेअरची किंमत 2.33 टक्क्यांनी वाढून 215.40 रुपयांवर पोहोचली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 01:21 PM2024-03-08T13:21:09+5:302024-03-08T13:21:56+5:30

गुरुवारी कंपनीच्या एका शेअरची किंमत 2.33 टक्क्यांनी वाढून 215.40 रुपयांवर पोहोचली.

Bharat Electronics Ltd government company to give dividend for the 42nd time, record date fixed Bonus shares paid 3 times share market investment | ४२ व्यांदा डिविडंड देणार 'ही' सरकारी कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित; ३ वेळा दिलेत बोनस शेअर्स

४२ व्यांदा डिविडंड देणार 'ही' सरकारी कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित; ३ वेळा दिलेत बोनस शेअर्स

सरकारी कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (Bharat Electronics Ltd) बाबत मोठी बातमी समोर येत आहे. कंपनी ४२व्यांदा लाभांश देण्याची शक्यता आहे. कंपनीनं या लाभांशाची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. गुरुवारी कंपनीच्या एका शेअरची किंमत 2.33 टक्क्यांनी वाढून 215.40 रुपयांवर पोहोचली.
 

कोणती आहे रेकॉर्ड डेट 
 

गुरुवारी म्हणजेच 7 मार्च 2024 रोजी शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत कंपनीनं म्हटलं की बोर्डाची बैठक 15 मार्च 2024 रोजी होणार आहे. या दिवशी कंपनीचं संचालक मंडळ दुसऱ्या अंतरिम लाभांशावर निर्णय घेतील. जर बोर्ड सहमत असेल तर कंपनी 23 मार्च 2024, शनिवार ही लाभांशाची रेकॉर्ड डेट मानेल. 
 

कंपनीनं दिलेत 3 बोनस शेअर्स
 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडनं 9 फेब्रुवारी 2024 रोजी अखेरचं एक्स डिविडंड ट्रेड केलं होतं.तेव्हा कंपनीनं एका शेअरवर 0.70 रुपयांचा डिविंडड दिला होता. 2015, 2017 आणि 2022 मध्ये कंपनीनं बोनस शेअर्सही दिले होते. 2022 मध्ये कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना 1 वर 2 बोनस शेअर्स दिले होते.
 

कशी आहे कामगिरी?
 

गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 53 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. तर एका वर्षात या शेअरनं 123 टक्क्याचा नफा मिळवून दिलाय. गेल्या एका महिन्यात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिडेटचा स्टॉक 18.4 टक्क्यांनी वाढलाय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Bharat Electronics Ltd government company to give dividend for the 42nd time, record date fixed Bonus shares paid 3 times share market investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.