Multibagger Stock: शेअर बाजारातून चांगला नफा मिळवणं सोपं नसतं. त्यासाठी सखोल संशोधन आणि संयमाची गरज आहे. गुंतवणूकदार नेहमीच मोठा परतावा देऊ शकतील अशा मल्टीबॅगर शेअर्सच्या शोधात असतात. परंतु प्रत्येक शेअर कमाई करून देईलच असं नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉक भारत रसायनबद्दल (Bharat Rasayan) सांगत आहोत, ज्यानं २६ वर्षात ४४,७०६.२६% परतावा दिलाय.
जर एखाद्यानं ७ जानेवारी १९९९ रोजी या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्यांच्या गुंतवणूकीचं मूल्य ४.४ कोटी रुपयांपेक्षा अधिक झालं असतं. त्यावेळी हा शेअर फक्त २४.७५ रुपयांवर होता आणि आज या शेअरची किंमत ११०५२.१५ रुपये झाली आहे. मात्र, या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या तज्ज्ञांचे मत घ्या.
१६ वर्षांत २८,०१४ टक्के परतावा
गेल्या १६ वर्षांच्या परताव्याबद्दल बोलायचं झालं तर १६ वर्षांत त्यानं २८,०१४ टक्के धमाकेदार परतावा दिलाय. २००९ मध्ये शेअरची किंमत ३९.४० रुपये होती. कामकाजादरम्यान सकाळी शेअरची किंमत ११,०९६ रुपये होती. एकूण रिटर्नबद्दल बोलायचं झालं तर २८,०१४% (म्हणजे २८० पट) आहे. जर तुम्ही २००९ मध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचंच मूल्य आज २.८१ कोटी रुपये झालं असतं.
शेअरची स्थिती काय
हा शेअर ११०४१.१५ रुपयांच्या तुलनेत आज रेड झोनमध्ये १०९६२.७० रुपयांवर उघडला आणि लवकरच तो ११२१९.९५ रुपयांवर पोहोचला. दुपारी पावणे दोनच्या सुमारास तो ११०२.५५ रुपयांवर आला होता. बाजार कमकुवत असूनही गेल्या महिन्याभरात सुमारे या शेअरनं १० टक्के परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत त्यात केवळ ३.५७ टक्क्यांची घसरण झाली आहे. यंदा आतापर्यंत त्यात ८.८० टक्के वाढ झाली आहे.
भारत रसायन ही कीटकनाशकं आणि रसायनं तयार करणारी अॅग्रोकेमिकल्स कंपनी आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या गरजा आणि निर्यातीची मागणी यामुळे या क्षेत्रात वाढीची संधी आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)