शेअर बाजारातील भारत रसायनाच्या शेअर्सने गेल्या दहा वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 6700 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या कालावधीत केवळ 10 हजार रुपयांचे 6.7 लाख रुपये झाले आहेत. गेल्या 5 वर्षांसंदर्भात बोलायचे झाल्यास, भारत रसायनाचे शेअर्स 100 टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. याच प्रमाणे, ज्या गुंतवणूकदारांनी गेल्या 3 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवणूक केली आणि ती कायम ठेवली, त्यांना आतापर्यंत 53 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.
कंपनीनं 15 वेळा दिलाय डिव्हिडेंड -
भारत रसायनकडून आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने डिव्हिडेन्ड दिला जात आहे. कंपनीने पहिल्यांदा सप्टेंबर 2023 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर 1 रुपयांचा डिव्हिडेंड दिला होता. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीने तब्बल 15 वेळा डिव्हिडेन्ड दिला आहे. याच वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात भारत रसायनने एका शेअरवर 1.5 रुपयांचा डिव्हिडेन्ड दिला होता.
शुक्रवारी भारत रसायनच्या एका शेअरची किंमत 9100 रुपये एवढी होती. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 9 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. तसेच, गेल्या एका वर्षात हा मल्टीबॅगर परतावा देणारा शेअर 15 टक्क्यांहून अधिकने घसरला आहे. कंपनीचा 52 आठवड्यांतील उच्चांक 11,793 रुपये प्रती शेअर, तर निचांक 8299 रुपये प्रति शेअर एवढा आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)